अवैध गौण खनिजे आणून जमीन डेव्हलप करण्याचा घाट.
*फक्त विहीर खोदाईची परमिशन*
नसरापूर (प्रतिनिधी):-
करंदी खे .बा येथील गट क्रमांक 205 राजाराम शेळके यांचे नावे असलेली ही जमीन डेव्हलप करण्यासाठी इतर ठिकाणाहून अवैध गोणखणीजे जाणून जमीन डेव्हलप करण्यात आले, यातील धक्कादायक बाब म्हणजे फक्त विहीर खोदाइसाठीची परमिशन आहे असे तलाठी यांनी सांगितले, मात्र लाखो रुपयांची अवैध गौण खनिजे आणून जमीन विकसित करण्याचा घाट घालून शासनाचा लाख रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम संबंधितांनी केली असल्याचे धक्कादायक बाब समोर आले आहे
सविस्तर माहिती अशी की या जमिनीचे दक्षिणेकडील बाजूस 30 ते 40 फूट खोल दरी वजा भाग होता पूर्व पश्चिम व उत्तर भाग सपाट होता मात्र दक्षिणेच्या भागात डेव्हलप करण्या अगोदर विहीर होती, विहीर खोदायच्या नावाखाली दक्षिण बाजूला ३० ते ४० फूट खोलदरी बुजवण्यासाठी व जमीन लेव्हल करण्यासाठी माती मुरूम व इतर गोणखणीजे इतर ठिकाणाहून आणले आहे, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे,

