पृथ्वीज बँक्वेट हॉलचे आज भव्य उद्घाटन

Maharashtra varta


पृथ्वीज बँक्वेट हॉलचे आज भव्य उद्घाटन!

नसरापूर( प्रतिनिधी):-

नसरापूर- वेल्हा रोड वरील कुरुंगवडी ता. भोर येथे शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी सायं. 6 वाजता पृथ्वीज बँक्वेट हॉलचे भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात   अनेक मान्यवर आणि गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहे.तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती अद्विका उद्योग समूहाचे पृथ्वीज बँक्वेट हॉलचे प्रो.प्रा. पै. धनेशशेठ डिंबळे,सौ.अमृता डिंबळे व अमोल शेठ शेडगे यांनी केले आहे.

अद्विका उद्योग समूहाचे पृथ्वीज बँक्वेट हॉलचे प्रो.प्रा. पै. धनेश शेठ डिंबळे यांनी या प्रसंगी बोलताना म्हटले की, "पृथ्वीज बँक्वेट हॉल हे आमचे स्वप्न आहे जे आज प्रत्यक्षात उतरले आहे. आम्ही लोकांना असे ठिकाण देऊ इच्छितो जिथे ते आपले खास क्षण साजरे करू शकतील आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करू शकतील."

पृथ्वीज बँक्वेट हॉल हे शेकडो  पाहुण्यांना सामावून घेण्यास सक्षम असलेले अत्याधुनिक सुविधांनी युक्त बँक्वेट हॉल आहे. यात अत्याधुनिक  अनेक सुविधा  माफक दरात मिळणार आहे.


अद्विका उद्योग समूहाचे पृथ्वीज बँक्वेट हॉलचे प्रोप्रायटर पै धनेश शेठ डिंबळे यांनी सांगितले की, "आमच्याकडे एक अनुभवी आणि समर्पित टीम आहे जी आपल्या प्रत्येक गरजेची काळजीपूर्वक काळजी घेईल आणि आपल्या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी कठोर परिश्रम करेल."पृथ्वीज बँक्वेट हॉल विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी योग्य आहे, जसे की लग्न, रिसेप्शन, वाढदिवस पार्टी, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि बरेच काही.

To Top