पृथ्वीज बँक्वेट हॉल हे स्वप्नांची व कल्पनाशक्तीची पूर्तता. विक्रम खुटवड.

Maharashtra varta

 पृथ्वीज बँक्वेट हॉल हे  स्वप्नांची व कल्पनाशक्तीची पूर्तता. विक्रम खुटवड. 


कुरुंगवडी येथे पृथ्वीज बँक्वेट हॉलचा उद्घाटन समारंभ संपन्न.



नसरापूर( प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

अद्विका उद्योग समूहाचे फाउंडर चेअरमन धनेशशेठ डिंबळे यांनी नेहमीच उद्योग क्षेत्रात आपली चिकाटी, परिश्रम सिद्ध करत उद्योग व्यवसाय मध्ये नवनवीन शिखरे पादाक्रांत केलेली आहेत, त्यातीलच एक भाग म्हणजे कुरुंगवडी येथील अद्विका उद्योग समूहाचा पृथ्वीज बँक्वेट हॉलचा हा उद्घाटन समारंभ म्हणजे पैलवान धनेश डिंबळे व त्यांच्या पत्नी  सौ.अमृता डिंबळे व उद्योजक  अमोल शेडगे यांचे स्वप्नांचे व कल्पनाशक्तीची आज खऱ्या अर्थाने  पूर्तता आहे,ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या धर्तीवर अत्यंत माफक दरात बँक्वेट हॉलच्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत, हे निश्चित प्रकारे आनंददायक व सामाजिक उपयोगाची  बाब आहे, असे प्रतिपादन भोर,राजगड  मुळशीचे युवा नेते विक्रम खुटवड यांनी केले.

कुरुंगवडी ता. भोर येथे अद्विका उद्योग समूहाचे पृथ्वीज बँक्वेट हॉलचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला, त्याप्रसंगी युवा नेते विक्रम खुटवड बोलत होते, ते पुढे म्हणाले की राजगड तालुक्यातील व भोर तालुक्यातील लोकांना माफक दरात विविध कार्यक्रमासाठी निसर्गरम्य वातावरणातील हा बँक्वेट हॉल अत्यंत  लोक उपयुक्त आहे, तुमचे प्रत्येक कार्यक्रमाचे क्षण या बँक्वेट हॉलमध्ये निश्चित प्रकारे आगामी काळात अविस्मरणीय ठरणार आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.तृप्ती खुटवड,भोर राजगड मुळशी हवेली पुरंदर खंडाळा आदी तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक उद्योग व्यापार सांस्कृतिक  क्षेत्रातील मान्यवर , विविध गावचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,पंचक्रोशीतील नागरिक ,प्रशासन अधिकारी, ,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते,विविध प्रतिष्ठान अध्यक्ष व सहकारी आणि पै.धनेश शेठ डिंबळे मित्र परिवार  ,कुटुंबातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी हिंदी मराठी गीतांचा नजराणा आर्केस्ट्रा संपन्न झाला.


भोर, राजगड मुळशीचे  युवा नेते विक्रम खुटवड यांच्या हस्ते  फीत कापून मान्यवरांच्या,मित्र परिवार यांचे  उपस्थितीमध्ये पृथ्वीज बँक्वेट हॉलचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अद्विका उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष पै. धनेशशेठ डिंबळे यांनी केले तर ,या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी  तर  आभार उद्योजक पृथ्वीजचे प्रो. प्रा.अमोल शेडगे यांनी मानले .

पृथ्वीज बँक्वेट हॉल येथे लग्न रिसेप्शन ,वाढदिवस पार्टी, कार्पोरेट कार्यक्रम बरेच काही कार्यक्रम होणार आहे.

To Top