हवेली तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग शिंदे .

Maharashtra varta

 हवेली तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी  पांडुरंग शिंदे  .



हवेली( प्रतिनिधी):-

       हवेली तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग शिंदे यांची निवड करण्यात आली . यावेळी पुणे जिल्हा शिक्षक समिती चे सरचिटणीस  संदिपआप्पा जगताप ,पुणे जिल्हा शिक्षक समिती चे कोषाध्यक्ष  सुनील लोणकर , हवेली तालुका शिक्षक समिती चे नेते, पतसंस्थेचे माजी सचिव  बापू तावरे , मुळशी तालुका शिक्षक समिती चे माजी अध्यक्ष  राजेंद्र ढगे , पुणे जिल्हा शिक्षक समिती  पतसंस्थेचे विद्यमान संचालक  राजेंद्र जाधव ,  हवेली तालुका शिक्षक समिती चे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण उत्पाद , पुणे जिल्हा शिक्षक समिती चे प्रसिद्धीप्रमुख संजयनाना कुंजीर , जिल्हा  शिक्षक समिती पतसंस्थेचे माजी सभापती  लहू ढवळे ,पुणे  जिल्हा शिक्षक समितीच्या महिला प्रतिनिधी  दिपश्री वाणी , सुजाता गुजर ,  अनुराधा जगताप ,  वैशाली घुले , शिक्षक समिती चे सल्लागार विनायक गेडाम , चंद्रकांत शिंदे ,  प्रतीक गायकवाड ,  अमर गवळी ,  राजाभाऊ माने , रवींद्र दिवटे हे उपस्थित होते .

      या निवडीसाठी पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने सुनील लोणकर यांनी काम पाहिले . निवडीनंतर  केंद्रप्रमुख संजय चव्हाण ,  राजेंद्र ढगे , राजेंद्र जाधव यांनी नूतन अध्यक्ष शिंदे यांना शुभेच्छा दिल्या . शिक्षक समिती च्या विचारधारेला साजेसे काम करणार असून हवेली शिक्षक समिती शाखा बळकट करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी बोलताना सांगितले . प्रायोगिक तत्वावर  हवेली तालुका शिक्षक समिती कार्यकारिणी आणि सभासदांसाठी  जिल्हा शिक्षक समितीकडून  संघटनेचे  ओळखपत्र  बनविणार असल्याचे संदीपआप्पा जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले . 

       या निवडीनंतर पांडुरंग शिंदे यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  बापू तावरे यांनी केले तर आभार  श्रीकृष्ण उत्पाद यांनी मानले.

To Top