आमदार रोहितदादा पवार यांची हॉटेल विशालला भेट, जेवणाचे कौतुक.
भोर( प्रतिनिधी):- कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल विशालला भेट देऊन जेवण केले. हॉटेलच्या स्वादिष्ट पदार्थांचे त्यांनी कौतुक केले. येथील उत्तम रुचकर स्वादिष्ट भोजनाने रोहित पवार प्रभावित झाले.
हॉटेल विशाल हे पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील केळवडे च्या हद्दीमधील प्रसिद्ध हॉटेल विशाल आहे. येथे मराठी आणि पंजाबी पदार्थांची विस्तृत श्रेणी जेवण आहे. आमदार रोहितदादा पवार यांनी हॉटेलला भेट देऊन जेवण केले. त्यांनी मटण मसाला, चिकन करी, आणि दाल तडका सारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
जेवण झाल्यानंतर आमदार रोहितदादा पवार यांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, "हॉटेल विशालमधील जेवण खूपच छान होते. मला सर्व पदार्थ खूप आवडले. हॉटेलची स्वच्छता आणि सेवा देखील उत्तम आहे."
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हे भोर दौऱ्यावरती असताना हॉटेल विशालला सदिच्छा भेट दिलीत्यावेळेस ते बोलत होते, व जेवणाचा आस्वाद घेतला समवेत भोर राजगड मुळशी आमदार संग्राम थोपटे, भोर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य विठ्ठल आवाळे ,पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दादा टापरे भोर पंचायत समितीचे माजी सभापती होती लहू शेलार बाजार समितीचे मा. उपसभापती सोमनाथ निगडे भोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खुटवड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश बागल, दत्तभक्त अन्नछत्र मंडळ सेवा मंडळाचे नंदू काका कोंडे तसेच शुभम जगताप चेतन कोंडे लालू आप्पा कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हॉटेल विशालचे व्यवस्थापन आणि कर्मचारी आमदार रोहितदादा पवार यांच्या भेटीमुळे आणि कौतुकामुळे खूप आनंदीत झाले होते.

