लोकसभा निवडणुकीच्या आदेशाबाबत सकारात्मक चर्चा.
भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नांना येणार यश.
नसरापूर (प्रतिनिधी):-
दि 28/03/2024 रोजी भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांची भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या वतीने भेट घेतली. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेल्या निवडणूक आदेशाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक संघांचे अध्यक्ष सुनिल लेकावळे, सरचिटणीस विठ्ठल दानवले, कार्याध्यक्ष दिलीप चिकणे, बारे केंद्र संघटक समाधान शेंडगे, राजेंद्र बोडके, योगेश शिंदे उपस्थित होते. सदरच्या भेटीत लेखी निवेदन देण्यात आले. ज्या उपशिक्षकांना केंद्राध्यक्षाच्या ऑर्डर आहेत त्यांच्या ऑर्डर बदलून त्यांना मतदान अधिकारी क्रमांक एक दोन नेमणार आहे, तसेच ज्या बी एल ओंना ऑर्डर आलेले आहेत त्यांच्या देखील ऑर्डर रद्द होणार आहेत अपंग दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शिक्षकांचे देखील आदेश रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे