किल्ले केंजळगड संवर्धनासाठी राबले चिमुकल्यांचे हात, विद्यार्थ्यांसाठी आदर्श उपक्रम:-गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे.

Maharashtra varta

 किल्ले केंजळगड संवर्धनासाठी राबले चिमुकल्यांचे हात, विद्यार्थ्यांसाठी आदर्श उपक्रम:-गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे.



भोर (प्रतिनिधी):-

रविवार दि.24/03/2024रोजी होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरे, ता. भोर जि. पुणे येथील इयत्ता सातवीच्या 27 विदयार्थ्यांनी किल्ले केंजळगडावर  स्वच्छता व श्रमदान मोहिम राबवली. शाळेने राबविलेला हा उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी केले.


केवळ गडकिल्ले पाहुन काही होणार नाही तर पुढील पिढ्यानाही छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रचिती व्हायची असेल तर त्यासाठी गडसंवर्धन कार्य हाती घेऊनच गडकिल्ले संवर्धित करावे लागतील. यासाठी सरांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे आवाहन केले आणि मुलांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.


 विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान व्हायला नको यासाठी सुट्टीच्या दिवशी रविवारी सर्व विद्यार्थी किल्ले केंजळगडाकडे मार्गस्थ झाले. गडावर गेल्यावर गडाचा इतिहास समजून घेऊन आणि क्षणभर विश्रांती घेऊन  विद्यार्थ्यांनी संपूर्ण किल्ल्यावरील कचरा गोळा केला, प्लास्टिकच्या बाटल्या,प्लास्टिकच्या खाऊचे कव्हर, प्लास्टिकची पाकिटे मोठमोठ्या बॅग मध्ये भरून एका जागी जमा केला.या बॅग्ज गडावरून खाली आणण्यात आल्या.

  त्यानंतर किल्ले रायरेश्वरावर जाऊन रायरेश्वराचे दर्शन घेतले.मंदिराशेजारील तळ्याची देखील स्वच्छता केली.गडावरील स्वच्छता  करताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सर आता आपण गडावर मुक्कामालाच येऊ आणि अजून खूप काम करू असा विश्वास मुलांनी व्यक्त केला.

संध्याकाळ झाल्यावर छत्रपती शिवरायांच्या जयघोषात मुले अतिशय आनंदाने गडावरून खाली उतरली.सदरच्या मोहिमेत या वर्गाचे वर्गाशिक्षक श्री सुनिल लेकावळे व त्यांच्या 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

लहान विद्यार्थ्यांच्या या मोठ्या कामाचे सर्व पालकांनी व भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने कौतुक करण्यात येतं आहे.

शाळेच्या या उपक्रमाचे केंद्रप्रमुख पदमजा नाईक व गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार बामणे यांनी देखील कौतुक केले आहे.

To Top