ओ पाणी देता का? हो पाणी?

Maharashtra varta

 ओ पाणी देता का? हो पाणी?


करंदीकराची हाक कोण ऐकून घेईल





नसरापूर (प्रतिनिधी):-

ओ पाणी देता का हो पाणी? नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर यांच्या चित्रपटातील "घर देता का हो घर "यानुसार करंदीकरांना पाणी देता का पाणी, करंदी खे.बा. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची वणवण स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून ते आजपर्यंत सुरू असल्यामुळे करंदीचे नागरिक विशेषता महिला यामुळे त्रस्त झालेले पाहण्यास मिळत आहे.


करंदी खे.बा गावात पाण्याची भीषण  टंचाई झाली आहे. ग्रामस्थ आणि पाळीव जनावरे  बेहाल झाल्याचे चित्र दिसत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर , शेवटच्या घटका मोजत असून तेवढ पाणी गावाला पुरत नाही त्यामुळे विहिरीत थोडंसं पाणी असले तरी सर्वांना पाणी मिळेल असे तरी दिसून येत नसल्याचे चित्र आहे, वैयक्तिक असलेल्या बोरवेल देखील अर्धा पाऊण तास चालत आहेत ,काही जणांच्या बोअर बंद झाल्या आहेत,स्वतःच्या कुटुंबावर इतर दोन चार कुटुंबाची  कशीबशी व्यवस्था बोअरवेल द्वारे होत आहे,

पुणे जिल्ह्यातील करंदी खे.बा गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे गावातील विहिरी आणि बोअरव्हेल्स पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

गावातील लोकसंख्या सुमारे 1000हुन अधिक  आहे   पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे भोर तालुक्यात सर्वाधिक पाण्याची भीषण टंचाई करंदीकरांना जाणवणारच आहे, अजून मार्च महिना संपायचा आहे एप्रिल मे आणि जून मधले पंधरा-वीस दिवस असे जवळजवळ अडीच महिने अजून बाकी आहेत, उद्याच्या येणाऱ्या काळात पाणी कसे मिळेल याची चिंता भेडसावताना दिसत आहे.

ग्रामस्थांनी या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. गावातील विहिरी खोल करण्यात आल्या आहेत, नवीन बोअरव्हेल्स बांधण्यात आले आहेत, परंतु पाणीपुरवठा अजूनही अपुरा आहे.महिला पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतात. ग्रामस्थांच्या या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.


या समस्येवर काय उपाययोजना करता येतील?


पिण्याच्या पाण्याची स्कीम चे काम लवकरात लवकर सुरू होणे


पिण्याच्या पाण्याचे भीषण टंचाईच्या 4 महिने   अगोदरच  म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नियोजन व कार्यवाही करणे,ग्रामसभा घेणे.


गावात नवीन बंधारे आणि तलाव बांधणे.


पाणीपुनर्भरणासाठी प्रयत्न करणे.

पाण्याचा दुरुपयोग टाळणे.


जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठा वाढवणे.

बोगस नळ कनेक्शन बंद करणे.


ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी या समस्येवर मात करता येईल आणि करंदी खे.बा गावात पुन्हा एकदा पाण्याचा झरा वाहू शकेल.






To Top