विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बाल आनंद मेळावा उपयुक्त:- केंद्रप्रमुख साधना गायकवाड.

Maharashtra varta

 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बाल आनंद मेळावा उपयुक्त:- केंद्रप्रमुख साधना गायकवाड.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी  खे .बा. येथे बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार उपक्रम संपन्न .



नसरापूर ( प्रतिनिधी) :


विद्यार्थ्यांना गणिती विषयाची आवड निर्माण होऊन दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालणे ,नाणी, नोटा यांची भेट ओळख व्हावी, पैसे सुटे करणे,पैसे योग्य घेणें व बाकीचे देणे इत्यादी समजणे आवश्यक आहे ,त्यातूनच गणिती कौशल्य विकसित करणारा बाल आनंद मेळावा असल्याचे उदगार कामथडी  केंद्राच्या केंद्रप्रमुख साधना गायकवाड यांनी काढले.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी  खे. बा.  ता. भोर येथे दि. 20 मार्च   2024 ,रोजी  बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होते. ते पुढे म्हणाले की,अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन गणिती विषयाची आवड निर्माण होते.

त्याच बरोबर आठवडा बाजार देखील आयोजित करण्यात आला होता.साधारणतः 57 खाद्य पदार्थ व पालेभाज्या चे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेतील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष विक्री  करून घेतल्याने समजलेल्या ज्ञानाचे उपयोजन व कौशल्य पडताळता आले असल्याची माहिती उंबरे शाळेचे    मुख्याध्यापक  विजय नाना कारभळ यांनी बोलताना सांगितले.

"शेकडो पालक व ग्रामस्थ यांनी या शाळेच्या उपक्रमास प्रतिसाद व दाद देऊन उपक्रमाचे कौतुक केले". वस्तू विकताना मुलांना खूप आनंद वाटत होता. या उपक्रमात सहभागी शाळेतील सर्व मुले सहभागी झाली होती. यावेळेस पालक व ग्रामस्थांनी खाद्यपदार्थ व भाज्या विकत घेतल्या. एका  कोपर्‍यात असणारी खाऊ गल्ली  माजी विद्यार्थ्यांची आकर्षण बनली. यात कांदा, पालक, मुळे, मेथी, टोमॅटो, गाजर,मुळा या भाज्या तर इडली ,ओली भेळ, आप्पे, चंपाकली, भाकरवडी शेवरेवडी,चिक्की सरबत ,मिठाई, गुलाब जमून  केक,थालीपीठ पाणीपुरी,असे विविध खाद्यपदार्थ मुलांनी विक्रीस आणले होते.

"सुमारे 10000 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ व भाज्या एकाच तासांत विकल्या गेल्या.मुलांनी गणन, व्यवहार ज्ञान,नफा-तोटा, खरेदी-विक्री या क्रियांचा स्वानुभव घेतला.सहकार्य,नीटनेटकेपणा इत्यादी मूल्य रुजवण्यास मदत या उपक्रमामुळे होते."


यावेळेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया बोरगे , सरपंच नवनाथ गायकवाड, सदस्य कोमल गायकवाड, राजेंद्र गायकवाड ,तृप्ती पवार ,गणेश गोळे ,शांताराम खाटपे, तुकाराम बोरगे, अण्णा बोरगे, रवींद्र मांढरे, प्रकाश मस्के,  अनुजा बोरगे व गावातील महिला बालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या शाळेचे मुख्याध्यापक मीलन कांबळे सर ,तानाजी नाईलकर सर ,सुजाता तळेकरआणि  पंकज राठोड यांनी उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे प्रशंसा व  कौतुक केले


आदी उपस्थित होते.निगडे शाळेतील शिक्षकांनी   विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे गावातील सर्व नागरिक ,महिला पालक ,शिक्षणप्रेमी यांनी कौतुक करून शिक्षकांचे अभिनंदन केले.




To Top