वरोडी खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाचे प्रकाशन.

Maharashtra varta

 वरोडी खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाचे प्रकाशन.


भोर (प्रतिनिधी):-

   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोडी खु. येथे आंबाडे केंद्राचे वतीने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रथम सत्रात उद्धघाटनाच्या कार्यक्रमात शाळेतील २० विध्यार्थ्यांनी लिहिलेल्या "अंकुर" या स्वरचित कविता संग्रहाचे प्रकाशन अंबाडे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, सरपंच संदीप वरे, उपसरपंच सतीश वरे, नितीन वरे, मुख्याध्यापक संजय पवार, राजू कारभळ, भीमराव शिंदे, उषा गोरड, माधुरी घाटे, अनिल महांगरे व केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या वेळी सर्व विद्यार्ध्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच शिक्षण परिषदेत दुसऱ्या सत्रातअध्ययन निष्पत्ती निहाय संसाधन अंतर्गत नियतकलिक चाचणी मूल्यांकन व PAT या विषयावर महादेव बदक व मंगल घोलप यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन बापू जेधे यांनी केले व आभार अमर क्षीरसागर यांनी केले.

To Top