जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Maharashtra varta

 जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन.


नसरापूर (प्रतिनिधी):

जागतिक महिला दिनानिमित्त, विघ्नहर्ता सेवा प्रतिष्ठान, युनिक तायक्वांदो फाउंडेशन, वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमानाने,  दि. 17मार्च 2024 या दिवशी नसरापूर कुंभारकर लॉन्स या ठिकाणी पुणे जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील 240 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती सौ.सुनीताताई चंद्रकांत बाठे- मा. सभापती पंचायत समिती भोर., सौ. सपना ताई झोरे सरपंच नसरापूर

 मा श्री. लहू नाना शेलार -मा. सभापती पंचायत समिती भोर

 श्री.चंद्रकांत बाठे साहेब- आदर्श जिल्हा परिषद सदस्य

 मा श्री सुधीर दादा वाल्हेकर उपसरपंच नसरापूर.

मा श्री.संदीप दादा कदम- मा उपसरपंच नसरापूर.

मा सौ.वैशालीताई झोरे अध्यक्ष तनिष्का व्यासपीठ

मा सौ स्मिता विभुते उपाध्यक्ष तनिष्का व्यासपीठ

मा सौ वैशालीताई निकम सचिव युनिक तायक्वांदो फाउंडेशन

 ऍडव्होकेट मेघा ताई लष्कर

 ऍडव्होकेट अनुराधाताई कदम

 महाराष्ट्र पोलीस मा सौ भांड मॅडम

 महाराष्ट्र पोलीस मा सौ वीर मॅडम

 मा सौ अनिताताई गोळे सदस्य युनिक तायक्वांदो फाउंडेशन

 मा सौ सुरेखाताई मेमाणे सदस्य युनिक तायक्वांदो फाउंडेशन

 हे मान्यवर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये मुलांना शुभेच्छा देत असताना तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्ष वैशालीताई झोरे मॅडम यांनी स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर मुली व महिला सक्षम होण्यासाठी या कलियुगामध्ये संघर्ष करण्यासाठी मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे गरजेचे आहे. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मुलींना दिले.

 या स्पर्धेमधील विजेती खेळाडू

1) अदिती बाठे,19 वर्षाखालील मुली 40 किलो खालील वजन गटात 5555 रुपयांचा धनादेश शिवरत्न ग्रामीण पतसंस्था सारोळे यांनी दिला.

2) पूर्वा मेमाने 17 वर्षाखालील मुली 59 किलो खालील वजन गटात 4100 रुपयांचा धनादेश मा सभापती लहू नाना शेलार यांनी दिला.

3) मनस्वी बाठे 8 वर्षाखालील मुली 20 किलो खालील वजन गटात 3333 रुपयांचा धनादेश डॉक्टर डिंबळे सिद्धिविनायक हॉस्पिटल यांनी दिला.

4) अनुष्का खाटपे 12 वर्षाखालील मुली 38 किलो खालील वजन गटात 3333 रुपयांचा धनादेश छत्रपती पतसंस्थेचे मॅनेजर सारोळे यांनी दिला.

5) कादंबरी सुतार 8 वर्षाखालील मुली 22 किलो खालील वजन गटात  2222 रुपयांचा धनादेश सरपंच सपनात ताई झोरे यांनी दिला.

6) गिरिजा पांगारे  17 वर्षाखालील मुली 49 किलो खालील वजन गटात 1550 रुपयांचा धनादेश छत्रपती पतसंस्था नसरापूर यांनी दिला.

7) शर्वरी बाठे  12 वर्षाखालील मुली 32 किलो खालील वजन गटात 1111 रुपयांचा धनादेश सचिन रांजणे जिजाई हॉटेलचे मालक यांनी दिला.

8) प्रांजल जाधव 17 वर्षाखालील मुली 38 किलो खालील वजन गटात 1111 रुपयांचा धनादेश पाटील क्लिनिक कापूरहोळ यांनी दिला.

9) अपर्णा भरगुडे 12 वर्षाखालील मुली 35 किलो खालील वजन गटात 1111 रुपयांचा धनादेश पाटील क्लिनिक कापूरहोळ यांनी दिला.

10) अक्षरा मांढरे 8 वर्षाखालील मुली 24 किलो खालील वजन गटात 500 रुपयांचा धनादेश बालाजी हॉटेल कापूरहोळ यांनी दिला.

 प्रथमच तायक्वांदो खेळामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना धनादेश देण्यात आला आहे. यामागे एवढेच उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातील खेळाडू घडले पाहिजेत त्यासाठी युनिक तायक्वांदो फाउंडेशन कार्यरत आहे. युनिक तायक्वांदो फाउंडेशन चे गुरुवर्य जितेंद्र भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली,अध्यक्ष नीलम निकम मॅडम, सिद्धी पांगारकर मॅडम,गायत्री जाधव मॅडम, सृष्टी जाधव मॅडम, निशा चव्हाण मॅडम, यांनी या खेळाचे पंच म्हणून काम पाहिले.

To Top