भोर तालुका शिक्षक महिला संघाचे अध्यक्षपदी संगीता बोरगे यांची बिनविरोध निवड.
भोर (प्रतिनिधी):
भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशनात भोर तालुका महिला शिक्षक संघाचे अध्यक्षपदी सौ .संगीता सोपान बोरगे बिनविरोध निवड करण्यात आली. भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपद महीला आघाडी अध्यक्षपदी सौ. संगिता बोरगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी पत्रकार व निवेदक विठ्ठल पवार ,ज्येष्ठ नेते चांगदेव मसूरकर ,पोपट निगडे,नेते पंडित गोळे, कमलाकर मोहिते, संतोष कडाळे, अनंत आंबवले, विजू थोपटे कैलास खुटवड व शिक्षक संघाचे पदाधिकारी व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
दिनांक १३/३/२०२४ रोज़ी सचिनजी डिंबळे कार्यकारी राज्याध्यक्ष महानगरपालिका यांच्या उपस्थितीत तसेच .मा.अध्यक्ष सुदामजी ओंबळे आणि शिक्षक नेते अप्पा सावंत यांच्या प्रमुख निवडणूक निरीक्षक म्हणून पार पडलेल्या भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशनात निवड करण्यात आली आहे.

