शिक्षक संघाचे अध्यक्षपदी सुनील लेकावळे तर सरचिटणीस पदी विठ्ठल दानवले यांची बिनविरोध निवड.
भोर (प्रतिनिधी):-
भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशनात सुनील लेकावळे यांची भोर तालुकाशिक्षक संघ अध्यक्ष पदी तर विठ्ठल दानवले यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
सुनील लेकावळे यांची भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी,तसेच महीला आघाडी अध्यक्षपदी सौ. संगिता बोरगे यांची आणि उपाध्यक्ष पदी संदीप आप्पा सावंत, सरचिटणीस पदी विठ्ठलराव दानवले , कोषाध्यक्ष पदी गणपत दानवले सर, संपर्कप्रमुख म्हणून मनोजराव पुरंदरे ,कार्याध्यक्ष म्हणून दिलीपराव चिकणे सर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी ज्येष्ठ नेते चांगदेव मसूरकर ,पोपट निगडे,नेते पंडित गोळे, कमलाकर मोहिते, संतोष कडाळे अनंत आंबवले विजू थोपटे कैलास खुटवड व शिक्षक संघाचे पदाधिकारी व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
दिनांक १३/३/२०२४ रोज़ी सचिनजी डिंबळे कार्यकारी राज्याध्यक्ष महानगरपालिका यांच्या उपस्थितीत तसेच .मा.अध्यक्ष सुदामजी ओंबळे आणि शिक्षक नेते अप्पा सावंत यांच्या प्रमुख निवडणूक निरीक्षक म्हणून पार पडलेल्या भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशनात निवड करण्यात आली आहे.

