केळवडे नसरापुर शिवरस्ता खुला करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा:-स्वप्नील कोंडे यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Maharashtra varta

केळवडे नसरापुर शिवरस्ता खुला करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा:-स्वप्नील कोंडे यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी



नसरापूर (प्रतिनिधी):-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे युवा नेते स्वप्नील कोंडे सदिच्छा भेट घेऊन त्यांना केळवडे नसरापुर शिवरस्ता खुला करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.


कारण तिर्थक्षेत्र बनेश्वर मंदिर व किल्ले राजगड तोरणा वेल्हे तालुका व गुंजवणे खोरे येथे पर्यटक व स्थानिक नागरिकांना नसरापुर येथील ट्राफिक मध्ये नाहक त्रास होतो परंतु बाह्य मार्ग झाल्यास लोकांना होणारा त्रास कमी होईल यासाठी निवेदन दिले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  संबंधित अधिकारी यांना लगेच योग्य ते आदेश दिले .



To Top