नसरापूर केंद्रामध्ये एच. एस. सी. बोर्ड परीक्षेकरता विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत.

Maharashtra varta

 नसरापूर केंद्रामध्ये एच. एस. सी. बोर्ड परीक्षेकरता विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत.


विद्यार्थी झाले आनंदी आणि उत्साही.



नसरापूर( प्रतिनिधी):-

श्री .शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नसरापूर येथे इयत्ता बारावी च्या बोर्ड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये श्री शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेज नसरापूर , दिनकरराव धाडवे पाटील  ज्युनिअर कॉलेज सारोळा,  अमृता विद्यालय  नसरापूर  आणि  नवसह्याद्री गुरुकुल  कॉलेज नायगाव  या शाळेचे एकूण ४६६ विद्यार्थी परीक्षेला बसलेलेआहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे १८९, कला शाखेचे १२३, वाणिज्य शाखेचे १२२ आणि व्यवसाय विभागाचे ३२ विद्यार्थी आहेत अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य श्री शिंदे एस वाय आणि केंद्र संचालक श्री पुणेकर एस.ए. यांनी दिली. प्राचार्य  श्री शिंदे एस वाय, पर्यवेक्षक श्री खोपडे ए आर , केंद्र संचालक पुणेकर एस ए  उपकेंद्र संचालक  श्री मिसाळ  वाय एम श्री मोहिते एस एम आणि सर्व शिक्षक  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

To Top