गटशिक्षणाधिकारी के .डी. भुजबळ यांचे निधन.

Maharashtra varta

 गटशिक्षणाधिकारी के .डी. भुजबळ यांचे निधन.


शिक्षण क्षेत्रातला कर्मयोगी हरपला.



पुणे (प्रतिनिधी):-


KD  was symbol of quality.

मुळशी(पुणे) तालुक्यातील निर्भीड, कर्तव्यदक्ष गटशिक्षण अधिकारी, शिक्षक-पालक यांचे मार्गदर्शक किसन दत्तोबा भुजबळ अर्थात के.डी.भुजबळ याचे आज शनिवार २४ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे दुःखद निधन झाले शिक्षण क्षेत्रातला कर्मयोगी हरपला.

शिरुर तालुक्याचे सुपुत्र, मुळशी तालुक्याचे  अग्रगण्य, कार्यकुशल, तडफदार  गटशिक्षणाधिकारी, जुन्नर,हवेली,दौंड ,भोर आणि जिल्हा परिषद पुणे,मुख्यालयात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कुशल प्रशासक, जिल्ह्यातील न्याय,नीती व सत्याच्या मार्गावर चालणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक अधिकारी, कधीही कुणापुढे न झुकणारे, प्रशासनावर प्रचंड पकड असणारे. ज्यांच्याकडे कोणत्याही समस्येवर उत्तर हमखास मिळणार. दिलाचे दिलदार, मैत्रीचा शिरोमणी असे सुप्रसिद्ध कार्याचा वारसा जपणारे, भ्रष्टाचारी व्यवस्थेचा कर्दनकाळ, शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, शिक्षकांवर निस्सिम प्रेम करणारे किसन दत्तोबा भुजबळ साहेब  .
 
शिक्षकांना प्रेरणा देणारे आणि नेहमीच शिक्षकांच्या सकारात्मक कामामागे भक्कमपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व सरांच्या रूपाने कायमचे निघून गेले आहे. त्याची उणीव नेहमीच भासत राहिल.भुजबळ  साहेबांच्या स्मृतींना  भावपूर्ण श्रद्धांजली..सरांच्या चिरंतन आत्म्यास  चिरशांती सद्गगती लाभो,ही परमेश्वरचरणी विनम्र प्रार्थना..

To Top