जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंगवलीचे यश.

Maharashtra varta

 जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंगवलीचे यश.


यशाबद्दल आमदार संग्राम थोपटे यांनी केला विद्यार्थ्यांचा सत्कार.







नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

यशवंतराव कला क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत बालेवाडी येथे 29 जानेवारी रोजी धावती उंच उडी या स्पर्धेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक कुमार अमोल रघुनाथ थोर इयत्ता सातवी(७) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंगवली  यांचा आला आहे ,मार्गदर्शक शिक्षक,  खरात शहाजी, वर्गशिक्षक थोरवे ज्ञानेश्वर(सर) ,मुख्याध्यापक पांडुरंग जगताप. सहशिक्षक मोरे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व सदस्य नितीन लंके, अर्चना शिरगावकर, सोनाली भांडे, पूजा सुर्वे, अमृता ताठे, शितल सुर्वे, अविनाश पवार, सुप्रिया ताठे, प्रसाद भांडे, राजेंद्र सुर्वे, स्वाती गायकवाड, स्वाती खुटवड, भोंगवली गावचे  सरपंच अरुण पवार, उपसरपंच रेखा जाधव. त्या सर्वांच्या उपस्थितीत भोर ,वेल्हा, मुळशीचे कार्यसम्राट माननीय संग्राम  थोपटे यांच्या हस्ते कुमार अमोल थोर याचा सत्कार करण्यात आला. भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे व पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रभावती कोठावळे कदम मॅडम यांनी कौतुक करत अभिनंदन केले.
To Top