आंबाडे येथे ग्रामपंचायत कार्यालय व विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

Maharashtra varta

 आंबाडे येथे ग्रामपंचायत कार्यालय व विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न 




भोर ( प्रतिनिधी):-आंबाडे ता.भोर  जि. पुणे येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती काम तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साकव पुलाचे उद्घाटन बुधवार  रणजीत  शिवतरे, मा. उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. योगेशभाऊ शेलार, प्रदेशाध्यक्ष गडकिल्ले संवर्धन सेल महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  तसेच चंद्रकांत बाठे , मा.मानसिंग धुमाळ, रघुनाथ भोसले, सरपंच महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विकास कडू, अविनाश गायकवाड, गटविकास अधिकारी  किरणकुमार धनवाडे  या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सरपंच सौ हेमलता मिलिंद खोपडे यांनी सांगीतले की, गावामध्ये बरेच वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत नसल्याने खंत वाटत होती परंतु मा. रणजीत शिवतरे यांच्या माध्यमातून गावासाठी प्राप्त झालेल्या निधीमधून ग्रामपंचायत कार्यालयाची दर्जेदार व तसेच सुसज्ज अशी इमारत उभी करता आली याचा अभिमान वाटत आहे. तसेच शाळा दुरुस्तीच्या कामामुळे मुलांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देता आल्या.  तसेच मुख्य रस्त्यावरील साकव पुल दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाला होता त्यामुळे त्याचेही काम झाले त्यामुळे भविष्यात होणारी अडचण दूर झाली. या सर्व व यापूर्वी दिलेल्या निधीमुळे गावाचा कायापालट झाला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांसाठी रणजीत शिवतरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. योगेशभाऊ शेलार, प्रदेशाध्यक्ष गड किल्ले संवर्धन सेल महाराष्ट्र राज्य यांनी आपले भाषणात   सौ.हेमलता खोपडे यांनी देखने ग्रामपंचायत कार्यालय उभारल्याबद्दल कौतुकही केले तसेच आंबडे गावच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून पुढील कार्यक्रमासाठी अजित दादांना या गावात घेऊन येऊच असे सांगितले. तसेच रणजीत  शिवतरे यांनी आपल्या भाषणात सरपंच सौ.हेमलता खोपडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या केलेल्या कामाचे तसेच इतर केलेली कामांचे कौतुक केले तसेच पुढील  कालावधीत गावच्या विकासासाठी व्यायाम शाळा, अस्मिता भवन स्मशानभूमी सुशोभीकरण, स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता तसेच विशेष करून संविधान सभागृह उभारण्यासाठी निधी प्राप्त देण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमास उपसरपंच प्रमोद सपकाळ, सदस्य सौ.कविता खोपडे, सौ. गीता उल्हाळकर, विकास सोसायटीचे चेअरमन अशोक खोपडे, रणधीरभाऊ खोपडे, मनोज खोपडे,माजी सरपंच गोरखकाका खोपडे, पै.शिवाजीकाका खोपडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव खोपडे, उपाध्यक्ष विजूकाका खोपडे, ताराचंद खोपडे, ज्ञानेश्वर खोपडे, राजुकाका खोपडे, विजुआबा खोपडे, संपततात्या खोपडे, विनोद खोपडे, अशोकभाऊ खोपडे, मोहनबाबा खोपडे, नंदाआप्पा खोपडे, सुरेश खोपडे, दत्ता खोपडे, पोपट निकम, राजू खोपडे, अशोकनाना खोपडे, अमर खोपडे, प्रसन्न  उल्हाळकर, तुकाराम उल्हाळकर पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रभावती कोठावळे कदम सेच वीस गाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले आभार रामचंद्र खोपडे यांनी मांडले.

To Top