भोर येथील अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम थांबवण्यासाठी मनसे पुणे जिल्हा यांचे प्रशासनाला निवेदन.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा यांचे वतीने भोर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी ,तहसीलदार भोर ,प्रांत भोर व भोर पोलीस स्टेशन भोर यांना भोर शहर, वेताळ पेठ येथील कोर्टाच्या जागेमध्ये भोर नगरपरिषद अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता अनाधिकृत दर्ग्याचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम थांबवून सुरू असलेल्या कामावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले.
स्थानिक हिंदू लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, या ठिकाणी नाथ बाबाची जागा आहे. तेथे परंपरेने आरतीही होते, त्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण त्वरित हटवावे व कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन करून अतिक्रमण हटवण्यात येईल ,असा इशारा . संतोषआप्पा दसवडकर (मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष), श्री. दिगंबर चोरघे (मनसे वेल्हे तालुका अध्यक्ष) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेल्हे.यांनी दिला आहे.

