दुसरे निवडणूक प्रशिक्षण दुसऱ्या दिवशी.
भोर (प्रतिनिधी):-
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम ठरवला असून भोर तालुक्यामध्ये एकुण १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक १/११/२०२३ रोजी होणारे निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संकलित परिक्षा दिनांक ३०/१०/२०२३ ते १/११/२०२३ या कालावधीत घेणेत येणार असलेने दिनांक १/११/२०२३ रोजीचे प्रशिक्षणामध्ये बदल करणेबाबत गटशिक्षणाधिकारी भोर यांनी संदर्भातील पत्रान्वये कळविले आहे. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की, ग्रामपंचायत निवडणूक २०२३ करीता नेमणूक करण्यात आलेल्या माध्यमिक व प्राथमिक निवडणूक कर्मचान्यांचे दिनांक १/११/२०२३ रोजीचे प्रशिक्षण दिनांक २ / ११ / २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता अभिजित मंगल कार्यालय भोर येथे घेण्यात येईल. याबाबत सर्व संबंधित प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शाळेतील निवडणूक प्रक्रीयेसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचान्यांना सदरची बाब निदर्शनास आणून देण्यात यावी. असे पत्र तहसीलदार भोरचे सचिन पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी भोर यांना दिले आहे.

