ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२३ च्या कामातून महिला शिक्षिका , अपंग शिक्षक आणि आजारी शिक्षकांना वगळणार.

Maharashtra varta

 भोर तालका शिक्षक समिती च्या वतीने   तहसीलदार  ( भोर ) यांना निवेदन.

    ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२३  च्या  कामातून  महिला  शिक्षिका  , अपंग शिक्षक आणि  आजारी  शिक्षक बांधवांना  वगळण्याची  भोर तालुका शिक्षक समिती ची मागणी . 

भोर (प्रतिनिधी):-

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२३  च्या  कामातून  महिला  शिक्षिका  , अपंग शिक्षक आणि  आजारी  शिक्षक बांधवांना  वगळण्याची  भोर तालुका शिक्षक समिती ची मागणी आहे.

   भोर चे तहसीलदार  सचिन  पाटील   यांच्या कार्यालयाकडून   सकारात्मक  प्रतिसाद  , महिलांसह , आजारी  शिक्षक ,  अपंग  कर्मचारी  यांना  निवडणूक  कामातून  दिलासा मिळणार  असल्याचे  संकेत मिळाले आहे. 

 आज दि.2नोव्हेंबर 2023 रोजी  तहसीलदार भोर यांना निवेदन  देताना , भोर तालुका शिक्षक  समिती चे नेते  संजय पवार सर ,  भोर तालुका शिक्षक समिती चे अध्यक्ष महेंद्र शिंदे ,  पुणे जिल्हा शिक्षक समिती चे  सरचिटणीस  संदीपआप्पा  जगताप ,  पुणे जिल्हा शिक्षक समिती च्या  जिल्हा पतसंस्थेचे संचालक , भोर  शिक्षक  समिती चे सरचिटणीस  सुरेश खोपडे  आणि  रवींद्र  थोपटे  सर उपस्थित होते . 


To Top