पुणे जिल्हा ग्रामीण"प्रवक्ता म्हणून शैलेश जाधव निवड.
भोर( प्रतिनिधी):-
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने शैलेश जाधव यांची पुणे जिल्हा ग्रामीण"प्रवक्ता "पदी नियुक्ती करण्यात आली.हे नियुक्तीचे पद त्यांना नुकतेच देण्यात आले, यावेळेसमहाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत तसेच मुख्य प्रवक्ते दिपक दादा राठोड ,पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे उपस्थित होते.
या निवडीबद्दल जाधव यांनी बोलताना सांगितले की,दिलेल्या या जबाबदारी बद्दल आणि प्रदेश युवक काँग्रेस ने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच दिलेल्या पदाला योग्य न्याय देण्याचा ठाम विश्वास आपणास देतो,आमदार संग्राम थोपटे साहेब,पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार संजयजी जगताप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत तसेच मुख्य प्रवक्ते मा.दिपक दादा राठोड,पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

