मतदान अधिकाऱ्यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडाव्यात :- तहसीलदार सचिन पाटील.

Maharashtra varta

 मतदान अधिकाऱ्यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या  पार पाडाव्यात :- तहसीलदार सचिन पाटील.

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण भोर येथे संपन्न.


भोर (प्रतिनिधी):-

राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या नियम व सूचना प्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज व्हावे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना सोपवलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या व्यवस्थित रित्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात असे आवाहन भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ,भोर राजेंद्र कचरे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका निवडणूक अधिकारी सचिन पाटील  यांचे अधिपत्याखाली हे प्रशिक्षण संपन्न  झाले.


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 -24 मतदान अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक व प्रशिक्षण  दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी अभिजीत मंगल कार्यालय महाड नाका भोर येथे  संपन्न झाले.

भोर तालुक्यातील  मे  2023 ते  नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 46 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होत आहे. एकूण प्रभाग 100, मतदान केंद्र 100, व निवडणूक निर्णय अधिकारी 27 नियुक्त करण्यात आले आहे .ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदाना करीता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1,2,3 यांची यावेळेस नियुक्ती करण्यात आली.

या प्रशिक्षणात केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. निवडणूक विषय कायदेशीर तरतुदी, आदर्श मतदान केंद्र रचना, मतदान कक्ष साहित्य वाटप व कृती बॅलेट व कंट्रोल मशीन आदि बाबी ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या सहाय्याने पी पी  टी द्वारा प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले.


(मतदान कसे करायचे ,याबाबतचे बॅलेट व कंट्रोल चे प्रात्यक्षिक कामी भोरचे नायब तहसीलदार अरुण कदम,अजिनाथ गाजरे, सरोदे भाऊसाहेब ,बापू जाधव आदि उपस्थित होते.)

To Top