करंदी खे.बा. पोलीस पाटील पद निवड नावास हरकत.

Maharashtra varta

 करंदी खे.बा. पोलीस पाटील पद निवड नावास हरकत.


*भोर* ( *विशेष प्रतिनिधी* )

मौजे करंदी खे.बा .तालुका भोर जिल्हा पुणे येथील पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेची तात्पुरती दिनांक 12.10.2023 रोजी आलेल्या निवड यादीमध्ये  गणेश आत्माराम गोळे यांच्या असलेल्या नावास करंदी खे. बा.येथील  विजय ज्ञानोबा कव्हे यांनी 16/ 10/ 2023 रोजी प्रांत कार्यालय, भोर येथे हरकतीचा अर्ज दिलेला आहे.

वरील विषयाला अनुसरून मौजे करंदी खे.बा.तालुका भोर येथील पोलीस पाटील पदासाठी निवडलेल्या निवड प्रक्रियेची तात्पुरती यादी १२/१०/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये निवड झालेले आहे. सदर निवडी बाबत विजय ज्ञानोबा कव्हे यांनी गणेश गोळे यांचे  EWS प्रमाणपत्र व  फौजदारी गुन्हा याबाबत हरकत घेतलेली आहे .


या हरकतीबाबत गणेश आत्माराम गोळे यांना 20 ऑक्टोबर 2023 रोजी समक्ष उपविभागीय दंडाधिकारी, भोर उपविभाग भोर यांच्या समक्ष हजर राहून लेखी पुरावे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. जर या तारखेस उपस्थित राहिला नाही, तर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे प्रांत नोटीसी मध्ये कळवण्यात आलेले आहे.

गणेश गोळे यांची घेण्यात आलेल्या पोलीस पाटील परीक्षेमध्ये गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड करण्यात आलेली होती, मात्र विजय ज्ञानोबा कव्हे  यांनी याबाबत पुराव्यासह याबाबत  हरकत अर्ज दाखल करून, गणेश गोळे यांना तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या  पोलीस पाटील पदापासून पाय उतार व्हावे लागेल की नाही ?याचा फेसला २०-१०-२०२३ रोजी होणार असल्याचे बोलले जात आहे.

विजय कव्हे  यांनी गणेश गोळे यांची पोलीस पाटील पदासाठी तात्पुरती निवड झाली याबद्दल आक्षेप घेताना कागदपत्रे सादर केले आहे.

याबाबत भोरचे  उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, याबाबत संपूर्ण कागदपत्राची शहानिशा करून,शासन निर्णयानुसार निकाल जाहीर केला जाईल, त्यामुळे करंदी खे.बा.चे पोलीस पाटील पद तूर्तास लांबणीवर पडेल की काय ?काय व कसे असा प्रश्न निर्माण होतो की काय असे जाणवु लागले आहे.

To Top