गुजरातचा क्रीडा विभागासाठीचा निधीतून पैसा जातो कुठे? याची सखोल चौकशीची मनसेची मागणी.

Maharashtra varta

 गुजरातचा क्रीडा विभागासाठीचा निधीतून पैसा जातो कुठे? याची सखोल चौकशीची मनसेची मागणी.





पुणे (प्रतिनिधी):-

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताने १०७ पदके जिंकली, याचा भारतीय नागरिक म्हणून आपल्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, भारतीय खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, मात्र गुजरातचा क्रीडा विभागासाठीचा निधीतून पैसा जातो कुठे? याची सखोल चौकशी व्हावी ,अशी मागणी पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर यांनी केले आहे .

पुणे  येथे पत्रकार परिषद संपन्न झाली, याप्रसंगी दसवडकर बोलत होते, पुढे  संतोष आप्पा दसवडकर यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र  राज्य सरकारकडून क्रीडा विभागासाठी केला जाणारा खर्च हा खूप अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंनी यातील जवळजवळ 31 पदके जिंकलेली आहेत, राज्य सरकारकडून क्रीडा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च त्यानुसार करणे अपेक्षित आहे ,मात्र गुजरात राज्याचा विचार करता गुजरात राज्यामध्ये आशियाई खेळामध्ये खेळाडूंची कामगिरी शून्य आहे,मात्र गुजरात राज्यात क्रीडा विभागासाठी 608 कोटी रुपये हा सर्वात जास्त निधी खर्च केला जातो, नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई खेळामध्ये हरियाणा ने 44 पदके जिंकलेली आहेत, मात्र हरियाणामध्ये गुजरातच्या फक्त पंधरा टक्के म्हणजेच 89 कोटी रुपये क्रीडा विभागासाठी खर्च केला जातो ,तर गुजरातच्या निधीतून पैसा जातोय कुठे याची सखोल चौकशी आता व्हायला  हवी ,अशी मागणी पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर यांनी याप्रसंगी केलेली आहे.

To Top