करंदी खे.बा. ग्रामपंचायतीला गटविकास अधिकारी यांची भेट.
ग्रामपंचायतच्या कामकाजाची पाहणी व सूचना.
नसरापूर :-(प्रतिनिधी):- काल दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवडे यांनी करंदी खे. बा. येथे भेट देत ग्रामपंचायतच्या कामकाजाची पाहणी करत ग्रामसेवक यांना सूचना दिल्या.
ग्रामपंचायतच्या कार्यालय नूतन जागेची गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी केली व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या कामकाजाचे व काही दप्तर तपासणी करत ग्रामसेविका शेलार यांना सूचना केल्या, त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासाठी जागा प्रस्तावित करून ग्रामसभेची त्वरित मान्यता घ्यावी. नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रस्ताव सादर करावा. अनुसूचित जाती नवबौद्ध विकास घटक योजना 2022 -23 मधील रमाई नगर येथील रस्ता बांधकाम डिसेंबर 2023 अखेर तातडीने पूर्ण करावे ,जी कामे मुदतबाह्य झाली आहेत त्या कामांचा निधी परत करावा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे ताबडतोब सुरू करण्यात यावी, मनरेगा योजनेतील सर्व अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करा. के सी मानधन 50 हजार त्वरित अदा करण्यात यावे, पंधरावा वित्त आयोगाची रक्कम आराखड्यानुसार तत्काळ खर्च करण्यात यावी .जेईएम रजिस्ट्रेशन करून घेण्यात यावे .मातोश्री पानंद रस्ता चालू करणे बाबत तात्काळ कार्यवाही करावी, कर मागणी बिले अद्यापही देण्यात आली नाही तत्काळ बिले देण्यात यावी, ग्रामपंचायत नमुना नंबर 1 ते 33 अद्ययावत करण्यात यावे .ग्रामपंचायत मार्फत कामे करताना कोणताही गैरव्यवहार व अनियमितता होणार नाही याची सक्त सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळेस केले. सन 2022- 23 मधील कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्याबाबतच्या परिपत्रकाचे मासिक सभेत वाचन करावे अशा रीतीने अशा विविध सूचना गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविका शेलार यांना यावेळेस देण्यात आल्या.
याप्रसंगी भोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमरजा दंडे मनरेगाचे साईराज, शाखा अभियंता इकबाल शेख ,ग्रामसेविका शेलार व सामाजिक कार्यकर्ते अमोल राजाराम गायकवाड ,ग्रामपंचायत शिपाई व ग्रामपंचायतग्रामपंचायत केंद्र संचालिका यावेळेस उपस्थित होते.

