सह्याद्री सोसायटीतील राम गेला.
मी पाहिलेले रामदास चोरघे.
सहज ,साध ,सरळ ,निर्मळ विचार जगणारे व व्यावहारिक वागणारे रामदास चोरघे मी पाहिले.
सर,
आपल्याला कोणाचा तळतळाट नसावा आणि आपण आपल्या कष्टाने मोठ व्हाव आणि कष्टातूनच आपण उभं राहावं, जीवन जगत असताना आपल्याला वायफळ देखील जीवन जगता येतं ,परंतु वायफळ विचाराने समाजाला दळभद्री दिशा न दाखवता एक आपल्यामुळे समाजातल्या कोणत्या व्यक्तीला त्रास होऊ नये, कोणी त्यापासून दुखावू नये अशा रीतीने वागलं पाहिजे, हा साधा सहज निर्मळ विचार घेऊन जगणारे रामदास चोरघे होते. एक चांगला भला माणूस. सह्याद्री सिटी मध्ये मी जरी राहण्यास नसलो तरी अधून मधून फोन करून, का होईना सर पाच मिनिट गेट वरती थांबा,
तुमच्याशी मला बोलायचं,तुम्ही भेटत नाही,असे म्हणायचे,
मग आम्ही चहा घ्यायचो, गप्पा मारायचो आणि गप्पा मारता मारता, मी अनेकदा त्यांच्या आजारपणाबद्दल तब्येतीबद्दल विचारपूस केली , सर याचा मला त्रास होतोय किंवा आता जीवन नकोसे वाटते ,असा एकदा देखील विचार किंवा लवलेश आपल्या चेहऱ्यावरती न मांडता *आलेला दिवस आनंदाने सुखाने जगायचा हा विचार देणारा एक हा माणूस होता,
सह्याद्री सोसायटीमध्ये सामाजिक सांस्कृतिक उपक्रम असतील, त्या उपक्रमात हिरहिरीने ते सहभागी होत .सामाजिक सांस्कृतिक उपक्रम केवळ सोसायटीचा नाही, तो माझा स्वतःचा आहे,ही सामाजिक भूमिका चोरघे यांची होती, ज्या ज्या वेळेस सोसायटीतील रहिवाशांच्या अडीअडचणी असतील, अडीअडचणी कोणी मांडली असतील ,तर हा माणूस पुढे येऊन सांगायचा , आपण ते पाहू या , सगळ्यांशी अगदी घरातल्यांसारखाच संपर्क असणारा हा माणूस, आज पासून आपल्या सोसायटीमध्ये आता ते दिसणार नाही.
रामदास चोरगे यांच्या जाण्याने एक स्वच्छ नेक सामाजिक कार्यकर्ता, एक चांगला माणूस, कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व आज हरपले, याचे अतीव दुःख माझ्या मनाला खूप होत आहे. शब्दांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
_________________________
शोकाकुल:-

