भोर तालुक्यात शिक्षकदिनी काळ्या फिती लावून शिक्षक आंदोलन .
भोर (प्रतिनिधी) : 'आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या' या एकमेव मागणीसाठी भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे संपूर्ण तालुक्यात शिक्षकदिनी मंगळवारी (ता. ५) काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. आहे. जिल्हा परिषद शिक्षकांना अध्यापनाऐवजी अशैक्षणिक कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे. शिक्षकांनी जनगणना, निवडणूक, आपत्तीकाळात मदत एवढीच कामे करावीत, असे न्यायालयाचे आणि सरकारचे आदेश असताना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात, अशी शिक्षक संघाची तक्रार आहे. असे भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे व शिक्षक संघाचे नेते पंडितराव गोळे, विजयकुमार थोपटे, महेंद्र आप्पा सावंत ,कमलाकर मोहिते यांनी सांगितले.
●मनःपूर्वक आभार●
भोर तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अशैक्षणिक काम विरोधात काळ्याफिती आंदोलनास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे यांनी मानले.

