विक्रम खुटवड यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत
नसरापूर(न्यूज वार्ता,महाराष्ट्र)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे कोल्हापूर येथे सभेसाठी जात असताना भोर तालुक्याच्या हद्दीत भोर आणि वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले .
कापूरहोळ येथील विक्रम खुटवड यांचे जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. उपसभापती विक्रम खुटवड व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार 375 किलोचा हार क्रेनच्या साहाय्याने घालत,व जेसीबीने पुष्पवृष्टी करत सत्कार करण्यात आला.
भोर, वेल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे-सातारा महामार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विक्रम दादा खुटवड युवा मंचचे अध्यक्ष समीर धुमाळ, पै. धनेश डिंबळे,तांभाड गावचे उपसरपंच सचिन सोंडकर, भास्कर सपकाळ, महेंद्र भोरडे, नथुराम गायकवाड, गणेश मालुसरे, राहुल गाडे, अमीर बाठे, महेश मालुसरे,भरत बोबडे, माऊली राऊत व मंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड शिवापुर टोल नाक्यावर भोर वेल्हे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत जेसीबी मधून पुष्पवृष्टी व क्रेनच्या साह्याने भला मोठा हार घालत केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चंद्रकांत बाठे, पुणे जिल्हा परिषदेचे मा .उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष घोरपडे ,यशवंत डाळ संदीप नांगरे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

