करंदी शाळेने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली,तृणधान्याबाबत जागरूकता :-
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
भरडधान्ये अथवा तृणधान्ये अत्यंत पौष्टिक अशी ही आपल्या आहारात असायलाच हवीत. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळा, कुटकी, यासारख्या भरडधान्य / तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्याबाबतचे पदार्थ आहारात असावेत, आज या शाळेतील उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण झालेली आहे , करंदी खे.बा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रम हे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सुयोग्य आहेत असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. सुप्रिया बोरगे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष 2023 या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खे.बा .यांनी तृणधान्य पाककला पदार्थ स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. त्याप्रसंगी बोरगे बोलत होत्या, शाळेचे मुख्याध्यापक मिलिन कांबळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या घरून विविध तृणधान्याचे विविध पदार्थ तयार केले होते, यामध्ये क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीसे शाळेच्या वतीने देण्यात आली व सहभागी विद्यार्थ्यांना देखील याप्रसंगी बक्षीस व कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ .सुप्रिया बोरगे स्वाती बोरगे, तृप्ती बोरगे,पत्रकार विठ्ठल पवार व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक मिलिन कांबळे सर ,तानाजी नाईलकर ,पंकज राठोड श्याम हेडगिरे, सुजाता तळेकर यांनी चांगल्या रीतीने या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम हेडगिरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पंकज राठोड यांनी मानले.

