जिल्हा परिषद प्राथ.शाळा न्हावी शाळेत आजी -आजोबा सह नातवंडांचे डोळे पाणावले.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
जिल्हा परिषद प्राथ.शाळा न्हावी शाळेत आजी आजोबा सह नातवंडांचे डोळे पाणावले.आजी आजोबा दिवस साजरा करतेवेळी आजी आजोबांनी नातवंडांनी गोड आठवणींना उजाळा देताना भावना अनावर झाल्या.यावेळी चिमुकल्यांनीही परिचय करून देताना स्वप्नानां गवसनी घालण्याचा शब्द भरल्या डोळ्यांनी आपल्या आजी आजोबांना दिला आणि उपस्थित्यांचाही कंठ दाटून आला.
यावेळी स्वप्नील महाराज काळाणे यांचे आजी आजोबां- संस्कारक्षम नातंवंडे यावरील व्याख्यान झाले.संगीत खुर्ची,नृत्य,उखाणे,पारंपा रिक वेशभूषा, विध्यार्थ्यांच्या कलाकृती सादरीकरण, पर्यावरणाचे महत्व, पाणी बचत,जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणेत आला. सर्व आजी आजोबांचा उत्साह आनंद देणारा होता,शिक्षक व लोकसहभागातून सुंदर कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम झालेवर गोड जेवण आयोजन करण्यात आले.
यावेळी संपतकाका सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गुलाबकाका सोनवणे, बबनदादा सोनवणे, तुकाराम सोनवणे, युवराज सोनवणे,शिवाजी पाटील,दिलिप बोन्द्रे,, अर्जुन जाधव, गणेश कोंडे, नारायण सोनवणे, बाळुनाना बोन्द्रे, विमल भूतकर, अजित दरेकर, शशिकला सोनवणे कल्याणीताई सोनवणे, हिराबाई भूतकर, गीता पाटील, उर्मिला भूतकर आदी आजी आजोबा मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्या भालेराव,सूत्रसंचालन रुपाली चाचर यांनी तर अनिल चाचर यांनी आभार मानले.

