करंदी खे.बा. येथे तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी चूरशीचे मतदान.
नसरापूर (प्रतिनिधी):-टी. व्ही.पवार.
करंदी खे.बा. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेतून भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वतीने विठ्ठल विनायक खाटपे यांचा 22 मतांनी विजयी झाले . त्यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली.
भैरवनाथ मंदिर येथे ता. 31 ऑगस्ट रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वतीने विठ्ठल विनायक खाटपे हे व करंदी पॅनेल कडून च्या वतीने निखिल रघुनाथ खाटपे यांच्यात सरळ- सरळ लढत झाली . उघडा उघड हात वर करून मतदान झाले, असे मतदान होणार असल्याची कानकून लागताच गावातील काही जणांनी मंदिरातून काढता पाय घेतला.नको माणसांच्या डोळ्यावर यायला ...पेट पडला त्या निवडणुकीवर ... राजकारणावर ....असे काही जण म्हणत ,पुटपुटत त्यातून बाहेर पडले,
करंदी खे.बा. तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी एकूण 135 मतदार उपस्थित होते. त्यातील 106 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर 29 जणांनी निवडणुकीसाठी मतदान करण्यास नापसंती दर्शवली.
ग्रामसेवक यांनी निकाल जाहीर केला. यावेळेस 64 नागरिकांनी विठ्ठल विनायक खाटपे पसंतीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहून मतदान केले. तर निखिल रघुनाथ खाटपे यांना 42 जणांनी त्यांच्या बाजूने उभे राहत हात वर करत मतदान केले. विठ्ठल खाटपे यांचा अधिक 22 मतांनी विजय झाला.
करंदी खे.बा. गावामध्ये निवडणूक म्हटलं की, गावात संवेदनशील वातावरण तयार होते, ज्याला काही समजत नाही, त्याच्या देखील अंगात निवडणुकीचं वार घुमायला लागत. गटतट सक्रिय होतात ,एकमेकांच्या भेटी गाठी पार्ट्या जेवणावळी चर्चा घोंगड्या बैठका जोरात सुरू होतं, वळवाच्या पावसाच्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस एकसारखा सुरू राहतो,असाच निवडणुकीच्या बाबतीत गावचा इतिहास असताना तंटामुक्ती स्थापना झाल्यापासून आजपर्यंत करंदी खे.बा. येथे निवडणूक झाली नव्हती ,मात्र यावेळेस अटीतटीची निवडणूक पार पडली आणि गावात पुन्हा एकदा गटातटाचे वातावरण तयार झाले. आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पदाची निवडणूक शांततेत ऐवजी गटातटात पार पडली आणि येणार वातावरण देखील गटातटात असणार आहे ,हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

