मोहरी केंद्राच्या शिक्षण परिषदेस डायट ची अचानक भेट.भेट.

Maharashtra varta

मोहरी केंद्राच्या शिक्षण परिषदेस डायट ची भेट.


नसरापूर (प्रतिनिधी):-

 ऑगस्ट महिन्यातील शिक्षण परिषद आज गुरुवार दिनांक 31/ 8/ 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी खुर्द येथे घेण्यात आली.या शिक्षण परिषदेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद पुणे येथील जेष्ठ अधिव्याख्याता माननीय श्री.महेशजी शेंडकर साहेब व मंगेश पावडे यांनी अचानक भेट देऊन शिक्षण परिषदेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी मोहरी खुर्द गावचे सरपंच श्री.सागर पांगरकर, मोहरी बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बलवान सर, उपसरपंच सौ.शिल्पा पांगारकर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अर्चना पांगारकर, श्री.सतीश पांगारकर तसेच केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. मराठी  विषयाच्या अध्ययन निष्पत्ती वर श्री. राऊत सर यांनी आणि इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती वर श्री निम्हण सर यांनी मार्गदर्शन केले. टॅग(Teachers Activity Group) संदर्भात सौ पोमन मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केले. दुपारी तीन वाजता शिक्षण परिषद संपली.

To Top