रचना संस्थेद्वारे तालुक्यातील शालेय मुलांना डोळे येण्याच्या आजाराबाबत मार्गदर्शन मोहीम सुरू.
पुणे( प्रतिनिधी)
रचना संस्था पुणे यांच्या वतीने भोर तालुक्यातील 24 वरीष्ठ प्राथमिक शाळांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नुकताच स्वच्छतेचा संदेश आणि हात धुण्याचे प्रात्यक्षिक 24 शाळांमध्ये घेण्यात आले. डोळ्यांचे संसर्गजन्य आजार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शालेय मुलांना त्याबाबत माहिती देऊन डोळे आल्यावर काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली.पत्रके वाटप करून मुलांना व शिक्षकांना तसेच पालकांना डोळ्यांची घ्यावयाची काळजी यावर माहिती देण्यात आली. हात धुण्यासाठी डेटोल साबण मुलांना वाटप करण्यात आले.रचना संस्था द्वारा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित या सोबत विविध विषयावर मार्गदर्शन केले जाते.त्याचा लाभ 24 शाळांमधील 2350 मुलांना होत असल्याचे शैक्षणिक प्रकल्पाचे समन्वयक श्रीपाद कोंडे यांनी सांगितले. या कामात संस्थेच्या संचालक स्वाती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी उंबरकर, मयुरी पवळे ,शुभांगी घाडगे, जयश्री वाल्हेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

