शिक्षक दिनी गुरुजीं विना भरणार शाळा

Maharashtra varta

 शिक्षक दिनी गुरुजीं विना भरणार शाळा


पुणे प्रतिनिधी( न्यूज वार्ता नेटवर्क)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अध्यापनापासून सातत्याने दूर ठेवणारी अशैक्षणिक  व ऑनलाईन कामे बंद लावून विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा व शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ शिक्षक दिनाच्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीअंतर्गत प्राथमिक शिक्षकांनी किरकोळ रजा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी गुरुजीविना शाळा भरणार असल्याचे चित्र राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

To Top