गरिबांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा.

Maharashtra varta

 गरिबांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा.



सोशल मीडिया वरती शिक्षकांचा व्हायरल होत असलेली वास्तव पोस्ट.

शिक्षण क्षेत्रात चाललेल्या सावळ्या गोंधळात ..कुणीही यावं ..अन् काही ही सांगावं.


*अरे .. चाललय काय ...??*

*शिक्षण संचालक पासून ते ..केंद्रप्रमुख...ज्याच्या मनात येईल ...तो ..नवीन उपक्रम काढतो..अन् शिक्षकांवर लादतो.*


*सरळ झालं...मग ..सरळ वर बदल्या.. सर्व्हर चा पत्ता नाही शिक्षक रात्रंदिवस परेशान...*


*Udise...ताबडतोब भरा...*


*Udise +... त्यात एका विद्यार्थ्यासाठी जवळपास  40 प्रश्न...*


*भलत्या सलत्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ..पेट्या ..बनवायच्या ... शाळांच्या माथी मारायच्या.. शिक्षक त्यात बेजार...कधी रचना वाद...तर कधी ज्ञानवाद...*


*खिचडी.. ..किडे लागलेले तांदूळ..अन् वाटाणे.. ग्रॅम मध्ये नोंदी...ग्रॅम मध्ये मोजायला काय दिलंय..???..दर रोज ऑनलाईन..2 रजिस्टर.. मंथली ऑनलाईन..वर्षात..4 हेल्थ ..तर तीनदा annual डाटा....रिकामे पोते..जमा करा...काय हा...* *हलकटपणा...*


*झाडे लावा..स्वच्छता गृह स्वच्छ ठेवा...गावात पिण्याला पाणी नाही ...अन् हे सांगताय .. टाकीभर पाणी ठेवा ..हाथ धुवायला...*


*मध्ये मध्ये काय तर स्वाध्याय सोडवा...महिलांना आयडिया व्हिडिओ दाखवा...नवसाक्षरता अभियान...स्वयंसेवक शोधा बिनपगारी..अन् शिकवा निरक्षरांना...*



*आता काय अंगणवाडीला भेट द्या ..अहवाल लिहा ...आपण अंगणवाडी भेट दिल्यावर ..अंगणवाडी वालीचा नवरा ..येणार नाही का आपली शाळा पाहायला. ???..*


*ॲप वर हजेरी ..ॲप वर स्वाध्याय...Read to me App...Diksha App. Swachata monitor App..Mdm app..Swift hat App..koo app.. whatsapp...*


*ॲप किती वापरायचे.??*


*मोबाईल आपला आहे की शासनाचा.???*


*अंगणवाडी वाल्यांना शासनाचा मोबाईल आहे .*


*दर रोज 4/5 GR...निघणार... त्यानुसार..नोंदी ठेवा....भारतरत्न ...राजकीय नेते...परमवीर चक्र..शस्त्रज्ञ...यांच्या जयंत्या..पुण्यतिथी..वनभोजन ..वनसहल..*


*SSA किर्द.. खिचडी कीर्द...विविध शिष्यवृत्त्या...*


.*.अर्ध्या तासात.../ एका तासात माहिती द्या...महिन्यात 4 मीटिंग..एक शिक्षण परिषद..एक पालक सभा..एक व्यवस्थापन समिती...*


*पुस्तक वाटप ..गणवेश वाटप.. खरेदी... ठराव..बिल जमा करा...बूट खरेदी...सॉक्स खरेदी...*


*अन् सरकार बदलले की नवीन बँकेत खाते काढा...पाहिले ADCC बँक...मग महाराष्ट्र ग्रामीण..मग ..बँक ऑफ महाराष्ट्र..मग Axis Bank..*


*आता HDFC.. मधे सांगितले ..द्या आधार द्या pan... मारा चकरा...अन्  करा विनंती बँकेला ...बँकेची वागणूक ..तर एकदम हलकट...*


*सरल पोर्टल

(शाळेची पूर्ण माहिती भरणे)

संच मान्यता

(working post )

student पोर्टल

(प्रमोशन,attach ,deaatach, new entry,adhar match,missmatch)

PM पोषण आहार

(anual data, monthaly data,student data)

google form link भरणे 

(पटसंख्या, नवीन प्रवेशित,शाळा खोल्या,नैसर्गिक आपत्ती, आवर भिंत, अवघड समस्या असलेले, वाद, विभागीय चौकशी)

vendor creat करणे 

(GST minus करून येणारी रक्कम)

PFMS प्रणाली

शिष्यवृत्त्या

(फॉर्म भरणे,याद्या बनवणे,पुन्हा सुधारित आदेशाप्रमाणे सादर करणे)

योजनांची माहिती देणे

रेकॉर्ड ठेवणे

शाळा दुरुस्ती /गळती/नवीन बांधकाम

शाळेचे,उपस्थितीचे ,बैठकीचे ,मीटिंग चे फोटो घेणे व पाठवणे

माहिती तत्काळ कळविणे

पिण्याचे पाणी

मैदान/क्रीडांगण

खेळाचे साहित्य

डिजिटल वर्ग व साहित्य

पाठाचे टाचण,

चाचणी 

चाचणीचे पेपर चे झेरॉक्स घेणे

जयंती/पुण्यतिथी अहवाल लेखन करणे

रंग रागोटी करणे

साहित्यांची निर्लेखन करणे

*माहिती अधिकार 2005 अन्वये माहिती मागितल्यास* त्या माहितीचे उत्तर देता देता मनस्ताप, इतर आजाराला आमंत्रण देणे, चकरा मारून बेजार होणे आणि आर्थिक दंड स्वीकारणे.

इतर नेत्यांचे पत्र त्यावरील  अमलबजावणी इत्यादी बाबी अजून कितीतरी विषय आहेत ..ज्यावर लिहता येईल...कुणी तरी अवतार घेईल आणि हे सर्व थांबवेल व शिक्षकांची कुचंबणा थांबवेल,गरिबांच्या जिल्हा परिषद शाळा वाचवेल ,गोरगरिबांची पिढी बरबाद होण्यापासून वाचवेल..ही भाबडी अशा..

To Top