बीएलओ कामे रद्द करण्याची पुणे जिल्हा शिक्षक संघाची मागणी.

Maharashtra varta

 बीएलओ कामे रद्द करण्याची पुणे जिल्हा शिक्षक संघाची मागणी


सर्व विभागांना बी एल ओ कामे विभागून देण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आश्वासन.



पुणे( प्रतिनिधी):-

राज्यातील प्राथमिक शिक्षक आधीच शिक्षणविभागाच्या अवांतर कामांमुळे त्रस्त आहेत त्यामूळे महसूल विभागाने शिक्षकांना दिलेली बी एल ओ कामे काढून घ्यावीत अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली  



 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गावपातळीवर कार्यरत सर्व शासकीय कर्मचारी वर्गांकडे विभागून कामे देण्याचे निर्देश आहेत मात्र शिक्षक वेळेवर आणि बिनचूक माहिती करत असल्यामुळे अन्य सर्व शासकीय विभाग वगळून शिक्षकांनाच मोठ्या प्रमाणात बी एल ओ कामे दिली जातात . 


सर्व शासकीय विभागात बी एल ओ ची कामे विभागून देण्याच्या मागणीस अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी सकारात्मक दर्शवली असून मा.जिल्हाधिकारी यांच्या संमतीने याबाबतचे आदेश सर्व तहसील विभागास देण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात देण्यात आले


पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने  यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सदर याचीकेतील निर्देशानुसार बी एल ओ कामास नकार देणाऱ्या शिक्षकांवर सक्ती करता येणार नाही असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.  न्यायालयाच्या सदर आदेशाची प्रत मा. जिल्हाधिकारी कार्यालयास यावेळी सादर करण्यात आली


यावेळी  जिल्हा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नेते राजेंद्र जगताप, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष रमेश मारणे, शिक्षण मंडळ सचिव राजेश राऊत, कोषाध्यक्ष आदिनाथ धायगुडे, संदिप कांबळे. महिला आघाडी माजी राज्याध्यक्षा अनुराधा तकटे, सरचिटणीस उज्वला नांदखिले, हवेली तालुकाध्यक्ष रमेशदादा कुंजीर, मुळशी तालुकाध्यक्ष शहाजी मारणे, इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब नरुटे, जुन्नर तालुकाध्यक्ष रमाकांत कवडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष सचिन तोडकर, खेड तालुकाध्यक्ष तानाजी म्हाळुंगकर, दौंड तालुकाध्यक्ष रामभाऊ दोरगे, पुरंदर तालुकाध्यक्ष तानाजी फडतरे, बारामती तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगताप, वेल्हा तालुकाध्यक्ष वसंत हारपुडे, भोर तालुकाध्यक्ष सुदाम ओंबळे, शिरूर तालुकाध्यक्ष संतोष गावडे, मावळ तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

To Top