नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षण कामावर बहिष्कार.

Maharashtra varta

 नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षण कामावर बहिष्कार.....


न्यूज वार्ता.

पुणे( प्रतिनिधी)

      पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या* वतीने *पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रमेश चव्हाण साहेब व शिक्षणाधिकारी मा. संध्या गायकवाड मॅडम* यांची भेट घेऊन *नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्वेक्षण कामावर बहिष्कार* टाकत असल्याबाबत निवेदन देण्यात आले.

      यावेळी *अशैक्षणिक कामे व सततच्या ऑनलाईन माहित्या व कामे बंद करण्यात यावीत, डायट कडून सतत राबविले जाणारे उपक्रम व लिंक बंद करण्यात याव्यात, मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी पदोन्नती तातडीने राबविण्यात यावी, रक्षाबंधन व गोपाळकाला सुट्टी जाहीर करण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता तातडीने फंडात जमा करण्यात यावा, प्रलंबित बिलांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मागविण्यात येवून तातडीने मंजूर करण्यात यावेत, आदिवासी क्षेत्रात सेवेत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, शनिवारची शाळेची वेळ ७.३० ते १०.३० करण्यात यावी, समाजशास्त्र पदास कायम संरक्षण देण्यात यावे व १२ वी विज्ञान पदवीधरांना पदावनत न करता पदवी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या वर्षातील बदल्या तातडीने करण्यात याव्यात, जुलै २०२३ अखेर पट ग्राह्य धरुन संचमान्यता मंजूर करुन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तातडीने करण्यात यावे, वाढीव शिक्षणास कार्योत्तर परवानगी देण्यात यावी,शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडून राबविण्यात यावी व सर्व नोंदी व हिशोब ठेवण्याचे काम सदर यंत्रणेकडे देण्यात यावे, शालेय पोषण आहाराचे सन २०१५ पासूनचे लेखा परीक्षण रद्द करण्यात यावे* इत्यादी मागण्या पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आल्या. *यासंदर्भात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

     तसेच *अप्पर जिल्हाधिकारी मा. अजय मोरे साहेब* यांची भेट घेऊन *प्राथमिक शिक्षकांना BLO कामातून वगळण्यात यावे* याबाबत निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

    यावेळी *जिल्हा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नेते राजेंद्र जगताप, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, कोषाध्यक्ष माऊली पुंडे, जिल्हा पदाधिकारी रमेश मारणे, राजेश राऊत, आदिनाथ धायगुडे, महिला आघाडी मा. अध्यक्षा अनुराधा तकटे, सरचिटणीस उज्वला नांदखिले, तालुकाध्यक्ष रमेश दादा कुंजीर, शहाजी मारणे, नानासाहेब नरुटे, रमाकांत कवडे, सचिन तोडकर, तानाजी म्हाळुंगकर, रामभाऊ दोरगे, तानाजी फडतरे, बाळासाहेब जगताप,शिक्षक नेते कल्याणराव गवळी,सोसायटी संचालक संतोषराव गाडेकर .वसंतराव हारपुडे, सुदाम ओंबळे, संतोष गावडे, सुरेश पाटील व तालुका पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी व संघ शिलेदार*  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top