मुख्याध्यापक व शिक्षक - 'ऑनलाईन कामाने वैतागले...'!
प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुपमधून लेफ्ट होण्याबाबत शिक्षक संघटनांचे आदेशानुसार घेणार भूमिका...
पुणे( प्रतिनिधी):●पत्रकार पवार◆-न्यूज वार्ता● दि:-17
मुख्याध्यापक व शिक्षक - 'ऑनलाईन कामाने वैतागले...'! शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना?परंतू अशा प्रकारे शिक्षकांनी व्हाट्स ग्रुपची निर्मिती करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला.तसेच 'अवांतर व अशैक्षणिक कामातून आमची मुक्तता करा.'अशा प्रकारची आर्त हाक व साकडे सर्वसामान्य शिक्षक बंधू भगिनींनी संघटनांच्या प्रतिनिधींकडे घातले आहे. या ग्रुपची स्थापना करत शिक्षकांना लिंक द्वारे जॉईन होण्याचे आवाहन केल्याच्या नंतर फक्त काही तासात ८२२ शिक्षक या ग्रुपला जॉईन झाले.त्यामध्ये सर्वात जास्त संख्या महिला शिक्षिकांची आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांना विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त राज्य शासन व प्रशासनाकडून दररोज वेगवेगळी अशैक्षणिक कामे करण्यास सांगितले जात आहे.
याबाबतची मंत्रालय पातळीवरील वेगवेगळ्या खात्याचे सचिवांसह,शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय,शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी , शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या डायट सारख्या असंख्य संस्था या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक माहित्या संकलित करण्यासाठी रोजच अनेक परिपत्रके,आदेश व्हाट्सअपद्वारे पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे मार्फत मुख्याध्यापकांना व शिक्षकांना दिले जात आहेत.सदर माहिती गोळा करण्यासाठी शिक्षक मेटाकोटीला आले आहेत.
माहिती मागवण्यासाठी मिळणारे आदेश हे कालमर्यादित, तात्काळ, त्वरित,ताबडतोब अशा प्रकारच्या सुचनांद्वारे केंद्रप्रमुखांमार्फत व्हाट्सअप ग्रुपवरुन देण्यात येतात.
यामध्ये रोज अनेक प्रकारच्या माहित्या या एक्सेलशीट द्वारे, ऑनलाईन, लाईनद्वारे भरण्यास सांगितले जाते. यामध्ये या माहिती संकलित करण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापक हे त्यांचे विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापनाचे कार्य सोडून संबंधित माहिती जमा करण्यासाठी, झेरॉक्स आणण्यासाठी जातात.
एखाद्या दिवशी तर वेगवेगळे अधिकारी अनेक प्रकारची माहिती मागवततात. सकाळी मागविण्यात आलली माहिती दोन तासात दिली तर दुपारी आणखीन दुसरीच नवीन प्रकारची माहिती देण्याचे फर्मान शिक्षकांना काढले जाते. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक या जाचाला पूर्णपणे कंटाळले आहेत.
अशा प्रकारे महिनाभरातून सुमारे १७ ते १८ दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मागवण्याचे काम प्रशासनाकडून केली जाते.
एखाद्या वेळी तर, दिवसांत पाच ते सात प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती जमा करण्यासाठी शिक्षकांना सांगितले जाते.त्यामुळे संबंधित माहितीचे संकलन करताना शिक्षक व मुख्याध्यापक मेटाकुटीला आले आहेत.
आज १७ ऑगस्ट रोजी देखील आज शाळांमध्ये प्रौढ साक्षरता उपक्रम २०११ बाबत सर्वेक्षण, विद्यार्थी संकलित चाचणी व शालेय पोषण आहाराचे दहा वर्षापासून चे ऑडिट असल्या तिहेरी भूमिका एकाच वेळी शिक्षकांनी कशा पार पाडाव्यात."-
आनंद गरगडे - प्रभारी मुख्याध्यापक- ता.दौंड
ऑनलाइन व अवांतर कामाला मुख्याध्यापक शिक्षक वैतागलेलेच आहेत तसे केंद्रप्रमुखही वैतागलेले आहेत या संदर्भात पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटना आज वरिष्ठांना भेटून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे या ग्रुप निर्मिती मागील यश आहे."
- कैलास गुंजाळ
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक - दौंड तालुका.
"शिक्षकांना दररोज एक्सेल शीट द्वारे ऑनलाईन "ऑफलाइन माहिती व्हाट्सअपद्वारे भरण्यास सांगितले जाते.तर व्हाट्सअप द्वारे कर्मचाऱ्यांना प्रशासकीय माहितीसाठी सक्ती करु नये.हे माहिती अधिकारात देखील प्रशासनाने कळवले आहे. तसेच शिक्षकांना शालेय वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. वापरल्यास दंड होईल असाही शासन आदेश आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकांनी मोबाईलचा वापर अशैक्षणिक कामे करण्यासाठी करावा का ? याविषयी शिक्षकांनी काय भूमिका घ्यावी ?"-संदीप कदम अध्यक्ष:- पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ
"अशैक्षणिक व अवांतर कामे शालेय अध्यापनाच्या वेळेत कमी करण्यासाठी राज्यभर लढा उभारण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वरिष्ठांची बोलणी सुरु आहे.-"सुनील कुंजीर अध्यक्ष पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समिती

