❝ आम्हाला शिकवू द्या ❞
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म घरातून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा निर्धार !!
●पुणे विभागातील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्धार .●
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
पुणे( प्रतिनिधी):-
राज्यभरातील अशैक्षणिक ऑनलाईन कामामुळे तसेच जिल्हा परिषदांच्या दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रातिनिधिक संघटना या नात्याने प्राथमिक शिक्षक संघाने आर या पार ची भूमिका घ्यावी अशी मागणी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्याकडे करण्यात आली.
राज्यभरात तीव्र आंदोलनाचा निर्धार पुणे विभागातील जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला, सातारा नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळावरील स्मारकाला अभिवादन करून आंदोलन निर्णायक स्थितीमध्ये नेऊन शासनाला अशैक्षणिक कामे मागे घेण्यास भाग पाडण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, बळवंत पाटील, महानगरपालिका संघाचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे यांच्यासह पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सांगली जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांतआबा यादव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रवी पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, सांगली सरचिटणीस अविनाश गुरव, कोल्हापूर सरचिटणीस सुनिल पाटील, सोलापूर सरचिटणीस सूर्यकांत डोगे, कोल्हापूर बँकेचे चेअरमन सुनिल एडके, हंबीरराव पवार यांच्यासह स्थानिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावातील ग्रामस्थ उपस्थित होते
_अध्यक्ष /सरचिटणीस_
_*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ*_
🏵️ *_पुणे विभाग_* 🏵️
*_पुणे ,सातारा ,सांगली, कोल्हापूर, सोलापूर_*

