शिक्षकांनो मोबाईल आपला शत्रू बनत आहे.
सासवड (वार्ताहर) एस कदम.
आपल्यातील अनेक शिक्षकांना बी एल ओ आदेशासहित अनेक आदेश व्हाट्सअप द्वारे दिले जातात. मग आपला मूळ मुद्दाच असा आहे की आपणाला व्हाट्सअप द्वारे आदेश किंवा माहिती देणे अशा प्रकारचा कोणताही प्रशासकीय आदेश आहे का ? आणि जर आदेश त्या पद्धतीचा नसेल तर आपण हे स्वतःहून *मोबाईल नावाचे* आपल्या स्वतःला मनस्ताप करुन घेणारे *हत्यार* का बाळगत आहोत ? तसेच आपल्याला प्रशासकीय ग्रुप तयार करा असा देखील कोठे आदेश आहे का ? नसेल तर आपण त्या ग्रुपमध्ये राहून दिवसभर येणाऱ्या सूचना व त्याद्वारे ही माहिती द्या.. ती माहिती द्या... वै. मनस्ताप का करुन घेत आहोत. म्हणून या विषयावर जोरदारपणे सर्वांनी मार्गदर्शन करावे आणि पुढे काय करायचे असा एकत्रित किंवा वेगवेगळ्या संघटनाद्वारे भर द्यावा. म्हणजे एखाद्याला आदेश द्यायचा म्हटलं तरी ते मोबाईलवरच व्हाट्सअपद्वारेच देतात. आणि एखाद्याला नोटीस द्यायची म्हटली तरी ते मोबाईल वर व्हाटस अपवरच देतात ? त्यामुळे आपला मोबाईल आपलाच *शत्रू* बनत आहे.

