पुणे जिल्ह्यात काँग्रेस अबाधित ठेवण्याचं योगदानरुपी काम थोपटे घराण्याच:- प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत.

Maharashtra varta

 पुणे जिल्ह्यात काँग्रेस अबाधित ठेवण्याचं  योगदानरुपी काम थोपटे  घराण्याच:- प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत.


पुणे( प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचे व चैतन्य निर्माण करण्याचे काम मा .मंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. आगामी काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मार्गदर्शना खाली युवक काँग्रेसचे चळवळ  जनमानसात निर्माण होईल असे काम करणार आहे, व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांनी आमचे केलेले स्वागत आणि मी अक्षरशः भारावून गेलो आहे ,असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले.


किकवी  व धांगवडी इंजिनिअरिंग कॉलेज येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदाधिकारी यांचा सन्मान गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, महेश टापरे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवायचे असेल तर कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांना ताकद व बळ द्यावेच लागेल. कारण पाच दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे विचार व कार्य जिवंत ठेवण्याचे काम थोपटे घराण्याने केले आहे.


पश्चिम महाराष्ट्र पाचवा दिवसाचा दौऱ्यादरम्यान किकवी ता.भोर येथे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे व भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची   सदिच्छा भेट दिली. या वेळी आपल्या “युथ जोडो, बूथ जोडो” उपक्रमाच्या अनूषंगाने युवकांशी संवाद साधण्यात आला.या माध्यमातून युवक कॉंग्रेस प्रत्येक बूथ आणि युथ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 


यावेळी   महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रभारी उदय भानू जी, सहप्रभारी एहसान खान जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले ,प्रदेश महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड,पिंपरी चिंचवड जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी प्रथमेश आबनावे,प्रदेश सचिव अनिकेत आरकड़े,शुभम बुराडे,विश्वजीत जाधव , अनिकेत नवले, अक्षय जैन   उपस्थित होते.


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून करण्यात आले, याप्रसंगी भोर,वेल्हा  मुळशीचे युवा नेते पृथ्वीराज थोपटे, भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर पंचायत समितीचे मा.सभापती लहू शेलार, मा उपसभापती रोहन बाठे, भोर विधानसभा युवक अध्यक्ष अमोल  पडवळ ,भोर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल कोंडे, युवा नेते अशोक वाडकर, राहुल बोरगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा उपसभापती सोमनाथ निगडे संचालक रणजीत बोरगे ,राहुल बोरगे, संतोष मळेकर, गणेश जाधव किरण मोरे अभिमन्यू कोंढाळकर, गणेश भिलारे, सचिन जाधव ,युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपस्थितांचे स्वागत महेश टापरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

To Top