भोर वेल्हा बी आर एस पक्षाच्या समन्वयक पदी संजय भाऊ कोंडे यांची निवड .
नसरापूर (प्रतिनिधी):-भोर वेल्हा बी आर एस पक्षाच्या समन्वयक पदी संजय भाऊ कोंडे यांची निवड करण्यात आली.
पुणे येथे बी आर एस पक्षाच्या विविध पदांसाठी नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला, पक्षप्रमुख तेलंगणाचे चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड करण्यात येत आहे.यामध्ये भोर तालुक्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात लोकाभिमुख काम करणारे केळवडे ता.भोर येथील संजय भाऊ कोंडे यांचे काम पाहून त्यांना भोर विधानसभेचे समन्वयक पदी निवड करून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचे बी आर एस पक्षाचे समन्वयक विजयराव देशमुख यांचे हस्ते हे नियुक्त पत्र देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती निवड कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळेस पुणे जिल्हा समन्वयक राहुल काळभोर, युवा नेते माऊली गायकवाड व पश्चिम महाराष्ट्रातील बी आर एस पक्षाचे तालुका समन्वयक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोर विधानसभा मतदारसंघाचे बी आर एस पक्षाचे समन्वयक संजय भाऊ कोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,'भारत राष्ट्र समिती' अर्थात BRS पक्षाचा भोर वेल्हा मुळशी तालुक्यात वेगाने प्रचार व प्रसार करणार असून पक्ष बांधण्यासाठी तन-मन-धनाने काम करणार आहे. राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने भोर विधानसभा मतदार संघात पाय रोवण्यास सुरुवात केली असून पक्षाचा प्रचार व प्रसाराची बैठक भोर मध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचा प्रचार व प्रसार तालुक्यात करणार असल्याचे ठरले आहे.

