मोहरी केंद्रातील शाळांमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा.

Maharashtra varta

 मोहरी केंद्रातील शाळांमध्ये रंगला, नवागतांचा स्वागत सोहळा.



नसरापूर( प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

भोर पंचायत समिती विकास गटातील, विविध केंद्रात भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे- केळकर यांचे नेतृत्वाखाली व मोहरी केंद्राच्या प्रभारी केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे कदम यांचे  मार्गदर्शनाखाली मोहरी केंद्रात शाळेचा पहिला दिवस आदर्श उपक्रमाने साजरा करण्यात आला.

उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ ,आणि चॉकलेट ,गुलाबपुष्प देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस मोहरी केंद्रातील विविध शाळात अविस्मरणीय करण्यात आला.


 शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुरावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले.


 शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून शालेय जीवनातील त्यांचे पहिले पाऊल जपण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा मोहरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत सर्वत्र रंगला होता.गुलाबपुष्पाने मुलांचे चेहरे खुलले   नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत  हातवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय बिरामणे यांनी औक्षण केले. 

शिक्षक अनिल बिरामणे यांनी त्यांचे शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत मिरवणुकीने केले . याप्रसंगी  शाळेत शाळेचा पहिला दिवस ‘आनंद मेळावा’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top