माणिकचंद दुगड यांची जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

Maharashtra varta

 माणिकचंद दुगड यांची जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.


पुणे (प्रतिनिधी):- 

पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दानशूर व्यक्तिमत्व स्व. माणिकचंद दुगड यांचे जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती उद्योगपती प्रमोद शेठ दुगड यांनी दिली.


करंदी खे.बा. ता. भोर येथे माणिकचं दुगड यांचे जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिनांक 3 मे 2023 रोजी माणिकचंद दुगड यांचे जयंती सामाजिक विचाराने उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. त्यामध्ये करंदी खे.बा.येथील आदिवासी महिलांना साडी वाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण व अन्नदान तसेच करंदी खे.बा. येथील नागरिकांना सात दिवस टॅंकरने सार्वजनिक विहिरीत पाणी सोडणे. आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती दुगड ग्रुप यांनी यावेळेस दिली.

स्वर्गीय माणिकचंद दुगड यांनी हजारो विद्यार्थ्यांचे स्वीकारलेले शैक्षणिक पालकत्व, गोशाळा,गोदान, अन्नदान,रक्तदान, मंदिरे उभारणे कामे योगदान, गोरगरिबांना मदत निराधार यांना आधार, भुकेलेल्याना अन्नदान, तहानलेल्या पाणी विचार कार्य माणिकचंद दुगड यांनी राबविलेले होते.

To Top