उद्योग व समाजसेवा क्षेत्रातील माणिकपुष्प चंदन पर्व:- दादासाहेब पवार.
स्व. माणिकचंद दुगड यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
माणिकचंद (भावसा)दुगड यांनी आपले जीवन सदैव समाजासाठी जगत, त्या कार्याचा कीर्तीचा दरवळत ठेवून आपल्या कुटुंबाबरोबर समाजातल्या दिनदुःखी गोरगरिबांची सेवा करणारे पुण्यनगरीतील दानशूर व्यक्तिमत्व उद्योगपती आदर्श समाजसेवक माणिकचंद दुगड हे उद्योग आणि समाज सेवा क्षेत्रातील "माणिक पुष्पचंदन पर्व" आहे, असे प्रतिपादन नवविकास शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी केले.
करंदी खे. बा. व पंचक्रोशीत तालुका भोर येथे स्व. माणिकचंद दुगड यांचे जयंती कार्यक्रम सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला, त्याप्रसंगी दादासाहेब पवार बोलत होते. स्व माणिकचंद दुगड यांचे जयंती निमित्त करंदी खेबा तसेच पंचक्रोशी परिसरातील 169 आदिवासी महिलांना साडी वाटप,850 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना व माऊली अनाथालय मधील विद्यार्थ्यांना खाऊवाटप व साहित्य यांचे वाटप व मोफत अन्नदान आदि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी दुगड ग्रुपचे उद्योगपती प्रवीण शेठ दुगड, नवविकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार ,करंदी खे.बा.चे सरपंच नवनाथ गायकवाड, उद्योजक अमोल गायकवाड ,विशाल तनपुरे शशिकांत गायकवाड, अप्पा परांडे,हर्षद जांभळे,तुषार पिलाणे,मयुर चिंधे,
पंजाब राऊत, महादेव मारंकडे,राम धांडेकर,रियाज कोतवाल,विजय कदम व करंदी खे.बा. परिसरातील शेकडो नागरिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांचे स्वागत भोर तालुका नारी समता मंचाचे अध्यक्ष विजय आबा कव्हे, यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार यांनी उत्कृष्ट केले . उपस्थितांचे आभार करंदी खे.बा.चे सरपंच नवनाथ आप्पा गायकवाड यांनी मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन गणेश गोळे व निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार यांनी केले होते.
*चौकट*
स्व. माणिकचंद दुगड यांचे जयंती निमित्त बोलताना दुगड ग्रुपचे प्रमोद शेठ दुगड यांनी सांगितले की, आधुनिक युगात प्रचंड विस्तारित शहरीकरणातही आज दुगड ग्रुप भावसा यांच्या संस्कारा मुळे विचारामुळे एकत्र कुटुंब पद्धती व जीवन मूल्यांचा संस्कार जोपासत, आम्ही ती आज पर्यंत टिकून ठेवली. कठोर परिश्रमाच्या बळावर व प्रामाणिकतेच्या जोरावर उद्योग क्षेत्रात दुगड परिवाराचे स्थान हे स्वर्गीय माणिकचंद भावसा यांच्यामुळे निर्माण झाले आहे, यशस्वी व प्रेरणादायी उद्योजक म्हणून आज दुगड ग्रुपने यश मिळवले. गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये शून्यातून विश्व निर्माण करत, प्रतिभावंत दुगड ग्रुप यांना या नावाने सुरू करून व्यवसायात यश मिळवले, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी आदरणीय माणिकचंद भाऊंनी जपली आणि तोच वारसा आम्ही टिकून ठेवत, आगामी काळात काम करणार आहे.
करंदी खे.बातील आदिवासी बांधवांना दुगड ग्रुप जमीन व निवाऱ्याची सोय आगामी काळात उपलब्ध करून देणार आहे .तसेच माणिकचंद भावसा यांचे जयंती निमित्त करंदी खे.बा नागरिकांसाठी मोफत टँकरची व्यवस्था देखील सुरू करण्यात आली आहे.

