संतोषअप्पा दसवडकर यांचे वाढदिवशी थेट गौतमी पाटीलची लावणी कार्यक्रम संपन्न ;
कार्यक्रमात हजारो तरुण थिरकले!
नसरापूर (प्रतिनिधी):-टी पवार.
संतोषअप्पा दसवडकर यांचे वाढदिवशी थेट गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता, महाराष्ट्र राज्यातील पहिलाच गौतमी पाटील चा कार्यक्रम असेल जो कार्यक्रम अतिशय शांततेत सुव्यवस्थित वातावरणात संपन्न झाला. भोर,वेल्हे,मुळशी,हवेली मधील तरुणांनी मोठ्या संख्येनं लावणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मातब्बरांच्या तसेच लहान मुलांच्या ज्येष्ठांच्या ,वाढदिवशी व यात्रा प्रसंगी गौतमी पाटीलचा शो होत असतात, पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर यांच्या वाढदिनी संतोष अप्पा दसवडकर मित्रपरिवार भोर,वेल्हे मुळशी यांनी वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा लावणी शो आयोजित केला होता. वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनला आणि गौतमी पाटीलचा डान्स पाहायला हजारो तरुणांनी व महिलांनी ,विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. वेल्हे तालुक्यातील विंझर येथे राजतोरण शैक्षणिक संकुला लगत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस भोर, वेल्हे ,मुळशी हवेलीतील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते, कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल पैलवान यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
यावेळी गौतमी पाटीलने केक कापून संतोष आप्पा दसवडकर यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर गौतमी पाटील यांचा डान्स पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून तरुणांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाल्यानंतर तरुणांनी शिट्ट्या वाजवत आणि 'सबसे कातिल गौतमी पाटील'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. याशिवाय काही तरुणांनी मंडपातच भन्नाट डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळं अनेकांनी या मजेशीर कार्यक्रमाचा आनंद लुटला.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची शांततेत थिरकाई.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची मोठ्या संख्येनं हजेरी असते. त्यामुळं काही अतिउत्साही तरुण गौतमी पाटीलला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती, वेल्हे पोलीस स्टेशनचा या कार्यक्रमा प्रसंगी कडेकोट बंदोबस्त व खाजगी शेकडो अंगरक्षक व शेकडो सुरक्षारक्षक,शेकडो स्वयंसेवक असल्यामुळे कार्यक्रम शांततेत व मस्तपणे झाला.
पुणे जिल्हा महाराष्ट्र मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधक भव्य दिव्य होम मिनिस्टर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या होम मिनिस्टर कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग नोंदवला, या होम मिनिस्टर कार्यक्रमात सौ.जयश्री संजय मेमाणे या होम मिनिस्टर ठरल्या. विजेत्या महिलांना हजारो रुपयांची बक्षीस वस्तू देण्यात आली तसेच सहभागी व उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू संतोष अप्पा दसवडकर मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले,
या वाढदिवस समारंभाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत वेल्हे तालुक्याचे उद्योजक अंकुशअण्णा दसवडकर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार विंझरचे आदर्श मा. सरपंच सतीश लिमन यांनी मानले.
संतोष आप्पा दसवडकर यांनी ऋण मनोगतात बोलताना सांगितले की, आपले स्नेह प्रेम शुभेच्छांच्या बळावरती मी सामाजिक सेवेत प्रभावीपणे काम करीत आहे, असेच पाठबळ व सहकार्य तुमचे माझ्या पाठीशी राहू द्या. आगामी काळात वेल्हे तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील,

