पुणे जिल्हा म.न.से चे जिल्हा अध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर यांचे वाढदिवसानिमित्त रविवार 16 एप्रिल रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन:- उद्योजक अंकुश अण्णा दसवडकर.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचे लावणीचा होणार जलवा.
पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोष आप्पा दसवडकर यांचे वाढदिवसानिमित्त विंझर ता. वेल्हे येथे रविवार दि.16 एप्रिल 2023 रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती आदर्श उद्योजक अंकुश अण्णा दसवडकर व विंझरचे आदर्श मा. सरपंच सतीश लिमन यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
मा. श्री. संतोष आप्पा दसवडकर यांचे वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते .गोरगरिबांचे दुःखीतांचे अश्रू पुसून त्यांना मदत करण्याचे काम गेले अनेक वर्ष संतोष अप्पा दसवडकर मित्रपरिवार करीत आहे., या ही वर्षी संतोष आप्पा दसवडकर मित्रपरिवार भोर,वेल्हे मुळशी यांच्या वतीने रविवार दि. 16 एप्रिल 2023 रोजी विंझर ता. वेल्हे येथे सायं. पाच ते सात वाजता होम मिनिस्टर च्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू व विजेत्या महिलेस हजारो व लाख रुपयांची बक्षिस वस्तू देण्यात येणार आहेत, तसेच रात्री नऊ ते बारा वाजता महाराष्ट्राचे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचे लावणीचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे.
तरी पुणे जिल्ह्यातील संतोष अप्पा दसवडकर यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रपरिवार नागरिकांनी ,महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष आप्पा दसवडकर मित्रपरिवार भोर, वेल्हे मुळशीचे वतीने करण्यात आले आहे.

