अखेर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रबळ एकजुटीचा विजय ..

Maharashtra varta

अखेर शासकीय कर्मचाऱ्यांच्या  प्रबळ एकजुटीचा विजय ..

मुख्यमंत्री यांचे जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासनानंतर संप अखेर मिटला.


पुणे (प्रतिनिधी):-पत्रकार  पवार.

गेले सात दिवस सुरू असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला असून, राज्य सरकार यांचे बरोबरच्या यशस्वी चर्चेनंतर ,आपण संप मागे घेत असल्याची घोषणा शासकीय कर्मचाऱ्यांच्या समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी जाहीर केले, राज्यात पुन्हा पूर्वी सारखी पेन्शन योजना सुरू होईल असे ही त्यांनीं सांगितले .

जुन्या पेन्शनसाठी संपुर्ण राज्यात सुरु असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप अखेर सातव्या दिवशी मिटला, हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय म्हणावा लागेल, शासना सोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन ,राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावा विश्वास काटकर यांनी केला, सरकारने याबाबत लेखी आश्वासन दिले आहे, असे ही काटकर यांनी जाहीर केले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबाबतचे निवेदन सभागृहात करतील त्यामुळे संप मिटला असल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर होतील , अशी माहितीही काटकर यांनी दिली.

संप मिटल्याने गेले सातदिवस संपामुळे, बंद असलेली सर्व शासकीय सेवा पुर्ववत उद्यापासून सुरु होणार आहे.

To Top