बेमुदत संप सुरूच राहणार... राज्य सरकारी, निम-सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समिती च्या बेमुदत संप सुकाणू समितीचा निर्धार...
पुणे (प्रतिनिधी):-
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीचा अव्हेर करून केंद्राप्रमाणे NPS मध्ये असणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि उपदान लागू करण्याची घोषणा विधिमंडळात राज्याच्या मा. मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली मुळात सदर घोषणा डिसेंबर 2022 च्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळीच शासनाने केली होती. त्यापूर्वी २०१८ मध्ये मागे घेतलेल्या संपाच्या वेळी राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ म्हटले होते. आता सुरू असलेला बेमुदत संप हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी असल्याने आणि राज्य शासन याबाबत निर्णय अशी भूमिका घेत नसल्यामुळे राज्य सरकारी, निम-सरकारी (जिल्हा परिषद) कर्मचारी, शिक्षक - शिक्षकेतर संघटना समन्वय समिती च्या सुकाणू समिती ने आज ठाकरसी भवन, मुंबई येथे मा. विश्वासजी काटकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शासनाच्या औदासिन्याचा निषेध करत बेमुदत संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी संपाच्या चौथ्या दिवशी राज्यातील सर्व संवर्गीय कर्मचारी, शिक्षक यांनी संपाला दिलेला सहभाग पाहता संपकरी आपल्या मागणीवर ठाम असून शासनाच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.
संपकरी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संपामध्ये कायम राहण्याच्या भूमिकेला सुकाणू समिती सॅल्यूट" करत असून त्यांचे अभिनंदन करीत आहे.-
जोपर्यंत जुनी पेन्शन योजना स्वीकृत होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील अशी घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक तथा सुकाणु समितीचे प्रमुख मा. विश्वासजी काटकर यांनी केली आहे.
राज्य शासनाने आपले आडमुठे धोरण सोडून निर्णायक भूमिका घ्यावी असेही सुकाणू समितीने स्पष्ट केले आहे.वितेश खांडेकर गोविंद उगले अध्यक्ष। राज्य सचिवमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना यांनी सांगितले आहे.तथा सदस्य, बेमुदत संप - सुकाणू समिती

